देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या असंख्य युध्दांवर आधारित चित्रपटांची बॉलीवूडमध्ये पूर्वीपासूनच निर्मिती होत होती. ज्या शूर योध्द्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांचा गौरव करणाऱ्या असंख्य चित्रपटांची निर्मिती झाली असून आता ‘झी सिनेमा’ वाहिनीवर शनिवार, २९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ‘पानिपत’ या नव्या महत्त्वपूर्ण युध्दपटाचे प्रसारण केले जाईल. चित्रपटात पार्वतीबाईंची भूमिक नामवंत अभिनेत्री कृती सनोन हिने साकारली आहे. तिने या भूमिकेसाठी खास मेहनत घेतली. तिने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं.

बद्दल बोलताना कृती म्हणाली, “या चित्रपटसठी मला तलवारबाजीचं खास प्रशिक्षण घ्यावं लागलं. ती काही सहज शिकता येण्यासारखी गोष्ट नाहीये, तरीही मला तलवारबाजीसाठी पेशवीणबाईंचे सर्व कपडे, नऊवारी साडी आणि सर्व दागिने घालून तलवारबाजीचे प्रसंग साकारावे लागले. असा जड पोशाख आणि दगिने घालून तलवारयुध्द साकारणं हे एक आव्हानच होतं. पण ते करताना मजाही खूप आली.”