नचिके त लेलेठरला झी मराठी ‘सारेगमप -घेपंगा कर दंगा’ पर्वाचा महाचर्जेता !
रविवारचा संपूर्ण दिवस संगीतप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरला. दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु असलेली संगीताची मैफिल अर्थात ‘सारेगमप -घे पंगा कर दंगा’ पर्वाची महादंगल ७ जानेवारीला पार पडली. अंतिम फेरीत पोहचलेल्या १२ सुरेल दंगेखोरांमधूनया पर्वाचा विजेता निवडण्यात आला. कल्याणच्या नचिकेत लेलेने आपल्या सुमधुर स्वरांनी ‘सारेगमप: घे पंगा कर दंगा’ पर्वाचे जेतेपद पटकावले. परीक्षक बेला शेंडे, स्वानंद किरकिरे, रवी जाधव आणि सूत्रसंचालक रोहित राऊतसोबत सुरांचा हा महासोहळा रंगला. १२ स्पर्धकांनी गायलेली एका पेक्षा एक गाणी, नेत्रदीपक सादरीकरण, हटके परफॉर्मन्सन या मनोरंजनाच्या यात्रेचा रसिक प्रेक्षकांनी झी मराठीवर दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत लाईव्ह आनंद घेतला.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले उज्ज्वल गजभार आणि तृतीय क्रमांक पटकावला अक्षय घाणेकरने! तिघांनीही आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. जेष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी मार्गदर्शक म्हणून सारेगमपच्या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यांच्याशिवाय, स्पर्धकांच्या सादरीकरणावर बारीक लक्ष ठेऊन होते खास पॅनालिस्ट, ज्यात होते पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, निलेश मोहरीर, मनवा नाईक आणि हृषीकेश जोशी आणि यांच्या पॅनलचं सूत्रसंचालन करत होता अभिनेता प्रियदर्शन जाधव!
या सोहळ्याचं खास आकर्षण ठरला, तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार! अक्षय आणि सोनम कपूर त्यांच्या आगामी ‘पॅडमॅन’या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सारेगमपच्या मंचावर आले होते. अक्षयने आपल्या खास शैलीत ‘ढगाला लागली कळ’ हे गाणं गाऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सलग १० तास सुरु असलेली ही संगीताची मॅरेथॉन उत्तोरोत्तर रंगत गेली. पहिल्यांदाच टेलिव्हिजनच्या इतिहासात अशा प्रकारचा लाइव्ह शो भरवण्यात आला होता. सारेगमपचं हे तेरावं पर्व खऱ्या अर्थाने वेगळं ठरलं. यापुढील पर्वांमध्ये सुद्धा निश्चितच वेगळेपणा पाहायला मिळेल.
Zee Marathi’s Sa Re Ga Ma Pa Ghe Panga Kar Danga Grand Finale Photos