Navin Bole

प्रसिद्ध मालिकेत नव्या कोणत्या पात्राची एन्ट्री होणार असेल तर ते पात्र काय ? कधी आणि कोणत्या भागात येणार ? अशी बरीच माहिती जाणून घेण्याची उत्सुकता रसिकांना असते.

तारक मेहता ही हिंदीतील खूप लोकप्रिय मालिका आहे. त्यात एक नवीन पात्र येणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

सब टीव्ही वरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते. नुकताच मालिकेचे ३ हजार भाग पूर्ण झाले आहेत.

आता मालिकेत एका कलाकाराची एण्ट्री होणार आहे. जाणून त्या कलाकारा विषयी…

आता लवकरच मालिकेत डॉ. मोनिकाची एण्ट्री होणार आहे.
त्यांच्या एंट्रीने आता मालिका अधिकच रंगत जातेय की दर्जा घसरतोय याकडेच सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत डॉ. मोनिकाची भूमिका अभिनेत्री नवीना बोलेने साकारली आहे. तिला आपण याआधी ही मालिका, वेबसिरीज मध्ये पाहिलं असेल. लवकरच ती तारक मेहता मध्ये रसिकांना भेटणार आहे.

तशी ती याआधी ही तारक मेहता या मालिकेशी जोडलेली होती; पण ती गर्भवती असल्यामुळे तिने ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा सज्ज झाली आहे. गेल्याच वर्षी तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

मालिकेचे निर्माते असलेले असीम मोदी यांनी पुन्हा तिला मालिकेत काम करण्याची संधी दिली आहे. तारक मेहता हा एक यशस्वी आणि कॉमेडी शो आहे. या मालिकेचा पुन्हा भाग होताना आनंद होत आहे असे नवीनाने म्हटले आहे.

कारण तिला तारक मेहता मधूनच प्रसिद्धी मिळाली होती. हे कदाचित ती विसरली नाहीये. नवीना ही इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

तिने इश्कबाज या लोकप्रिय मालिकेत देखील भूमिका साकारली होती. आता तिला पुन्हा तारक मेहता मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे.