तरुण मुला-मुलींना पिंपल्स, डार्क सर्कल्ससारख्या सामान्य समस्या नेहमी त्रास देतात. सर्वांनाच हा त्रास कधीना कधी होतो. पण शरीरातील हार्मोनल बदलांमुळे किंवा आपल्या त्वचेचे छिद्र अशुद्धतेने भरून बंद झाल्यामुळे पिंपल्स होत असतात. अशावेळी घरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टी तुमची पिंपल्स पासून सुटका करू शकतात. काय आहेत त्या गोष्टी नक्की वाचा.

नारळाचे तेल

नारळाचे तेल पिंपल्समुळे होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. नारळ तेलामध्ये अँटी-मायक्रोबियल गुण असतात. जे पिंपल्स कमी करण्यास मदत करू शकते. तुमची त्वचा तेलकट असल्यास नारळ तेलाचा वापर टाळा.

लसूण

4-5 लसूण पाकळ्या आणि ऑलिव्ह ऑईल गरम करून ते तेल गाळून घ्या. कापसाच्या बोळ्याने पिंपल्सवर लावा. 20 मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. दिवसातून दोन वेळा असे केल्याने आराम मिळतो. जास्त दिवस लसूण वापरल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते.

मध

मधात अँटी-बॅक्टेरीयल गुणधर्म असतात. पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया कमी करण्यात ह्याची मदत होऊ शकते. दिवसातून 2-3 वेळा मधाचा वापर पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.

एरंडेल तेल

चेहरा साफ करण्यासाठी थोडेसे पाणी उकळून त्याची वाफ घ्या. एरंडेल तेल आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण तोंडावर लावून ते वाळवा. हा लेप रात्रभर ठेवू शकता. आठवड्यातून दोनदा ह्याचा वापर पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.

कोरफड

फार पूर्वीपासून कोरफडीचा वापर त्वचेच्या विकारांवर केला जात आहे. कोरफड मध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत. कोरफडीचे आरोग्यदायी फायदे ह्या पूर्वीच्या लेखात कोरफडीचा वापर कसा करावा हे दिले आहे.

फिश ऑइल

फिश ऑइल हे एंटी-इंफ्लेमेटरी तत्वाचे तेल असते. हे पिंपल्समुळे होणारी सूज आणि तेल ग्रंथींनी तेलाचे स्राव कमी करण्यास मदत करते.