masala tak

दूध, दही, ताक हे पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. प्रोबायोटिक म्हणून हे पदार्थ ओळखले जातात. ह्यांचे रोज सेवन देखील विशेष आरोग्यदायी ठरते.

रोज ताकाचे सेवन शतायुषी होण्याचा एक सुलभ मार्ग आहे असे म्हणतात. असे मानले जाते की ताक पिल्याने पचनक्रिया सुधारते तसेच शरीरातील हिट कमी करून शरीराला थंडावा मिळतो.

ताक हे पोषकतत्वांचा उत्तम स्रोत आहेत. हे विविध प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि  कॅल्शिअमने परिपूर्ण असते.

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थात लॅक्टोज नावाची साखर असते. ह्यात असणाऱ्या लैक्टिक ऍसिडमुळे त्या साखरेचे पचन सुलभ होते.

बऱ्याच लोकांना लॅक्टोज इंटोलरन्स असतो. म्हणजे ते लोक असे पदार्थ सहजपणे पचवू शकत नाही अशा लोकांसाठी कल्चर ताक मिळते. ह्यात लॅक्टोज बॅक्टेरियाने आधीच साध्या साखरेत बदललेले असते त्यामुळे ह्याचे दुष्परिणाम देखील नसतात.

ताक कॅल्शियम, फॉस्फरसचा आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. तसेच व्हिटॅमिन के 2 ने देखील हे समृद्ध असते. हे पोषकतत्व हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांची झीज होऊन होणाऱ्या आजारापासून बचाव करण्यासाठी महत्वाचे आहेत.

ताक हे एक फर्मनटेड (आंबवलेला) दुग्धजन्य पदार्थ आहे. तोंडात असलेल्या त्वचेच्या पेशींवर दाहक किंवा जळजळ विरोधी प्रभाव दाखवण्यास ह्याची मदत होऊ शकते.

असे मानले जाते की ताकातील काही घटक  आतड्यात कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करून या  वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकतात.