तुम्हाला वाटेल किंबहुना सर्वांना असंच आजवर ज्ञात आहे की, हिंदी सिनेसृष्टीतल्या कलाकारांना मानधन फार जास्त प्रमाणात मिळतं. थोडक्यात हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलीवुडमधे पैसा अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे इथे कलाकारांच मानधन हे फारच जास्त असल्याच पहायला मिळतं.

परंतु असं असलं तरीदेखील या गोष्टी दिवसेंदिवस बदलत चालल्या आहेत आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीने गेल्या काही काळापासून आपलं वर्चस्व सर्व भारतभर प्रस्थापित करायला सुरूवात केली आहे. दाक्षिणात्य सिनेमांनी नेहमीच चांगल्या कलाकृतींचा, चांगल्या उत्तम कलाकारांचा आदर करत आज एक वेगळीच अदब जगासमोर मांडली आहे, हे निश्चित. त्यामुळे अर्थातचं त्यांचा सिनेमा आणि त्यांची सिनेसृष्टी बहरत गेली आहे.

आताच्या जमान्यात बोलायचं झालं तर हिंदी सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रींपेक्षाही दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काही अभिनेत्री अशा आहेत ज्या भक्कम स्वरूपाचं मनाधन घेऊन काम करत आहेत. दक्षिण भारतात एकूण अशा चार – पाच खास अभिनेत्र्या आहेत ज्या चांगलाच पैसा वसूल करतात. तर आज आपण त्यांचीच याठिकाणी माहिती पाहणार आहोत. आणि त्यांच्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल.

काजल अग्रवाल हा चेहरा आज सर्वांना परिचयाचा आहे. त्याच एक कारण हेही आहे की, तिने एक-दोन प्रोजेक्टवर हिंदी चित्रपटात काम केलेलं आहे. खरतरं काजल अग्रवाल हिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालयं. आणि लग्नानंतर तिच्या पदार्पणाची भुमिका असलेल्या “लाईव्ह टेलीकास्ट” या वेबसिरीजला थोडासा निराशाजनक प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला आहे. सिंघम आणि स्पेशल 26 यांसारख्या बॉलीवुड सिनेमात काम करणारी काजल आज तसं पाहता एका सिनेमासाठी 2 कोटींपेक्षा अधिक पैसे घेते.

आता दोन नंबरला सर्वाधिक पैसा घेणारी अभिनेत्री म्हणजे प्रियामणी. प्रियामणी सौंदर्याच्या बाबतीत तसं पाहता एका कोहीनूरच्या हिऱ्याइतकीच प्रखर तेजाची अभिनेत्री आहे. प्रियामणी सिनेस्क्रीनवर दिसता क्षणीच तिच्यावर चाहत्यांची नजर खिळून राहते यात काहीच दुमत नाही. प्रियामणी हिने चेन्नई एक्सप्रेस या सिनेमात एक आयटम साँग केलं होतं.

शिवाय ती कन्नड, तमिळ, तेलुगू या भाषांमधील सिनेमे करत असते. ती चक्क एका सिनेमाकरता नाही म्हणता, अडीच ते 3 कोटी रूपयांपेक्षा अधिक पैसे घेत असते. खरतरं सौंदर्याच्या आणि अदाकारीच्या बाबतीत ती अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.

आता पुढे या महत्त्वाच्या अभिनेत्रीबद्दल बोलायचं म्हटलं तर तिला थेट मिल्की क्विन म्हटलं जातं. मिल्की क्विन म्हणजे अर्थातच तमन्ना भाटिया. तमन्नाने बऱ्यापैकी इतर अभिनेत्रींपेक्षा हिंदी सिनेमे केले आहेत. आणि ती आपल्या भन्नाट कलाकृतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाचा अलगद ठाव घेऊ शकते.

शिवाय तमन्नाची जादू सर्वांनी बाहुबली सारख्या मोठ्या दर्जेदार सिनेमातूनही पाहिली आहे. तमन्ना खरतरं प्रत्येक सिनेमासाठी एक कोटींपेक्षा अधिक पैसे घेते. पण मुळात बाहुबलीसारख्या दुसऱ्या भागात तिच्या छोट्या वेळेपुरत्या असलेल्या भुमिकेसाठी तिला थेट पाच कोटी रक्कम मिळाली होती. तमन्नाच्या वाट्याला आजवर अनेक हिट सिनेमे आले आहेत.

आता पुढे बोलायचं म्हटलं तर ती अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश. किर्ती सुरेश या अभिनेत्रीला दाक्षिणात्य सिनेमांचा एक वेगळ्या दर्जाचा उत्कृष्ट चेहरा समजल्या जातं. किर्तीने आजवर तिच्या अभिनयाच्या सहजतेतून आणि दिसण्यातून लाखो करोडो रसिकप्रेक्षकांना तिचे चाहते बनवून सोडलं आहे.

किर्ती सुरेश तसं पाहता तब्बल 2 कोटी रूपये एका सिनेमासाठी मानधन आकारते असल्याची माहिती आहे. किर्ती सुरेश सध्याच्या घडीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचीही पहायला मिळते आहे. किर्तीच्या वाट्याला आजवर जेवढेही सिनेमे आले आहेत त्या सर्वांमधून तिने संधीच सोन करत आपली सिनेसृष्टीतील यशस्वी वाटचाल चालू ठेवली आहे.

आता विषय येतो तो म्हणजे, अनुष्का शेट्टी या अभिनेत्रीचा. अनुष्काने बाहुबलीच्या भरघोस यशानंतर आपल्या सिनेमांचं मानधन दुप्पट केलं आहे. ती तब्बल सध्यातरी एका सिनेमाचे 5 कोटी रूपये आकारते. अनुष्का शेट्टीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. शिवाय अनुष्काच्या अनेक हिट सिनेमांच कारण तिची अभिनयातली अदाकारी, लकब, हावभावांच कौशल्य हे सर्व आहे. अनुष्काने आजवर चांगले हिट सिनेमे दिले आहेत. परंतु तिने अजूनदेखील बॉलीवुडमधे कधीच कोणतं काम केलेलं नाही. अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य सिनेमांमधील एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!