नेता आणि अभिनेता यांसारख्या गोष्टींमधे अंतर जरी कमालीचं असलं तरीदेखील दोन्हीकडे एकप्रकारची सेलीब्रेटी लहेजाचीच भुमिका पहायला मिळते. कधीकधी ज्याप्रमाणे सिनेसृष्टीत अनेक नातेसंबंध विविध मार्गांनी प्रस्थापित होतात त्याचप्रमाणे काहीसं राजकारणाच्या बाबतीत आहे. अनेकदा राजकारण आणि सिनेक्षेत्रात जवळचं नातं आपल्याला पहायला मिळालं आहे.
अनेक सिनेअभिनेते अभिनेत्र्या या त्यांच्या एका कारकिर्दीनंतर राजकारणात पाऊल ठेवताना पहायला मिळतात. तर मुळात या गोष्टी इथे सांगण्याच कारण म्हणजे, दाक्षिणात्य सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली एक अभिनेत्री आज महाराष्ट्राच्या खासदार पदाचा चेहरा झालेली पहायला मिळते आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी इतर कोणी नसून आहे, “नवनीत कौर राणा.”
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात २०१९ सालात बऱ्याच मोठमोठ्या घटना घडल्याच्या पहायला मिळाल्या. आणि त्या सर्वांसोबतच नवनीत कौर राणा यादेखील अनेकदा प्रसारमाध्यमांमधे चर्चेत राहिल्या. त्यामुळे अनेकांची त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गोष्टी जाणून घेण्यात रूची वाढली. खरतरं वैयक्तिक आयुष्यापेक्षाही अनेकांना अधिक रूची राहिली ती म्हणजे, नवनीत कौर यांच्या प्रेमकहानीबद्दल.
खरतरं सुरूवातीला काही पंजाबी तर काही दाक्षिणात्य सिनेमे करणाऱ्या नवनीत कौर हिने २०१४ सालात आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. सर्वप्रथम एनसीपीच्या टिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीतने २०१९ सालात स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवली. आणि ती विजयी होऊन खासदार पदावर आरूढ झाली.
नवनीत कौर आणि बाबा रामदेव यांच नातं आधीपासूनच थोडं जवळच राहिलं आहे. बाबा रामदेव जे काही आरोग्यासाठी प्राणायाम व योगा यांचे शिबिर घ्यायचे त्यांना नवनीत कौर आवर्जून उपस्थित रहायची. नवनीत कौर हि खुप आधीपासूनच बाबा रामदेव यांना स्वत:च्या आयुष्यात वडीलांइतकंच मोलाचं स्थान देत असल्याची पहायला मिळाली आहे.
नवनीत कौर आणि तिचा नवरा जे की एक आमदार राहिले आहेत त्यांची भेट बाबा रामदेव यांच्याच एका शिबिरादरम्यान आश्रमात झाली होती. दोघांची इथे ओळख झाली, एकमेकांबद्दल उत्सुकता निर्माण होऊन मग पुढे त्यांच्या मैत्रीच रूपांतर प्रेमात बहरलं. यापुढेही खास बात म्हणालं तर या नात्याला पुढे लग्नाच्या बंधनापर्यंत आणण्याकरता नवनीतने बाबा रामदेव यांचा सल्लाही घेतला होता.
अमरावतीचे आमदार राहिलेले रवी राणा यांच्यासोबत नंतर नवनीत विवाहबंधनात अडकली. २ फेब्रुवारी २०११ रोजी दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला त्याकाळचे महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहारा ग्रुपचे चेयरमन सुब्रत रॉय, बाबा रामदेव यांच्यासोबत अनेक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होते.
पुढे चालून राजकारणात पाय रोवणारी नवनीत एक भरघोस यश मिळवलेली मॉडेल आणि अभिनेत्री होती. तेलुगू, पंजाबी भाषिक सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आपल्या अंदाजात असलेली वेगळी चमक, एक धाक, एक जरब या सर्व खुबींमुळे ती आजही नेहमी चर्चेत राहते. नवनीत राणा प्रामुख्याने एक पंजाबी कुटुंबातून आलेली आहे. तिचे आई-वडील महाराष्ट्रात राहतात. तिचे वडील एक आर्मी ऑफिसर आहेत. नवनीत आणि तिचा पती रवी राणा सध्यातरी जिवणात एक यशस्वी वाटचाल करत असल्याचं पहायला मिळतं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!