“जो जीता वही सिंकदर”, “चाची 420”, “हिम्मतवाला”, “वक्त हमारा है”, “संग्राम” यांसारख्या दर्जेदार सिनेमांमधून अभिनय केलेल्या आयशा जुल्का या अभिनेत्रीला सध्या हर एक व्यक्ती नक्कीच ओळखतो. खरं पाहता ९० च्या दशकात एकेकाळी या अभिनेत्रीनेही मोठ्या पडद्यावर आपलं व’र्च’स्व गा’ज’व’लं.

आपल्या अभिनयासोबतचं डोळ्यांची भेदक नजर आणि चेहर्‍यावरील गोड स्तिमहास्याने या अभिनेत्रीने सर्वांची मन अगदी क्षणभरात जणू जिंकून घेतली होती. एखाद्या सिनेमात तिची पडद्यावर एन्ट्री होताच टा’ळ्या आणि शि’ट्यां’चा थिएटरमधे जणू पाऊस पडायचा. 2010 साली “अदा… अ वे ऑफ लाईफ” या सिनेमातून पडद्यावर आल्यानंतर तिने बराच काळ ब्रेक घेतला आणि त्यानंतर ती थेट दिसली ती म्हणजे 2018 सालच्या “जिनीयस” या सिनेमात.

या अभिनेत्रीची नुकतीच काही दिवसांपूर्वी एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीदरम्यान तिने बऱ्याच गोष्टींवर संवाद साधला. विशेषत: जुन्या सिनेमांच्या आठवणींना उजाळा देतं त्यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्याबाबतही बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. वयाच्या खुपच कमी वयापासून सिनेसृष्टीत पाय रोवल्याने लग्न केल्यानंतर आयशा यांना वाटले की, लग्न झाल्यावर आपण थोडा महत्त्वाचा वेळ घर कुटुंबासाठी देणं गरजेचं आहे.

लग्नानंतर बॉलीवुडपासून दूर राहिल्याची त्यांना कसलीही खंत नाही उलट घेतलेल्या ब्रेकचा बऱ्यापैकी आनंदच आहे, असंही त्यांच म्हणणं आहे. आयशा तिच्या नवऱ्याबद्दल सांगताना म्हणतात की, त्यांना एक चांगला व समजूतदार पती लाभला आहे. आजवर आयशा त्यांचा सर्वाधिक वेळ हा सामाजिक कामात खर्च करत आल्या आहेत. आणि आयशा यांच्या मते त्यांना मुलं नको होती, म्हणून त्यांनी कधी एकाही मुलाचा विचार केला नाही.

आयशा जुल्का यांच्या मते त्यांच्या वाट्याला आणखी काही दर्जेदार सिनेमे आले असते. परंतु वेळेत योग्य निर्णय न घेतल्याने काही गोष्टी हातातून सुटून गेल्या. याशिवाय अनेकदा त्यांना सिनेसृष्टीतील कामाच्या व्यस्ततेमुळेही काही सिनेमे सोडावे लागल्याची खंत आहे. जसं की, मणिरत्नम यांची दर्जेदार कलाकृती “रोजा”.

तर दुसरीकडे एक सिनेमा बिकीनी पोझ असल्या कारणाने त्यांनी सोडला होता, हा सिनेमा म्हणजे “प्रेम कैदी.” सोबतच अनेक गोष्टींवर प्रकाश टाकताना आयशा यांनी हेदेखील सांगितलं की त्यांना न विचारताच त्यांची बॉडी डबल सिनेमाच्या शुटकरता वापरण्यात आली होती. “दलाल” या सिनेमात ही गोष्ट घडल्याची त्यांच्या नंतर लक्षात आली होती.

आयशाने मुलाखतीदरम्यान हादेखील खुलासा केला की, त्या इथून पुढे अनेक वेबसिरीजच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अर्थात या गोष्टीचा सर्वाधिक दिलासा त्यांच्या चाहत्यांना नक्कीच झाला असणारं. आयशा यांच्या वाट्याला अनेक चांगले सिनेमे भविष्यातही येऊ शकतात, यात काहीच दुमत नाही.

सध्यातरी आयशा यांच स्क्रीप्ट वाचन चालू आहे. आणि एखाद्या कलाकाराला चॅलेंज देईल अशा काही भुमिकेची त्यांना गरज वाटत आहे, जेव्हा असंकाही करायला मिळेल तेव्हा त्या निश्चितच आपल्याला टिव्ही, वेबसिरीज वा सिनेमांमधून पहायला मिळतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!