Sonalee Kulkarni B’day Bash Surprize

1228

कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या सेटवर सोनालीला मिळाले सरप्राईज !

महाराष्ट्रात हास्याला मिळाले हमखास आरक्षण, कारण महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शोकॉमेडीची बुलेट ट्रेन प्रेक्षकांना एका नव्या ढंगात सहा महिन्यांआधी भेटायला आला. या कार्यक्रमातीलकल्लाकार प्रेक्षकांना त्यांच्या अतरंगी, खुशखुशीत विनोदशैलीने पोट धरून हसवत आहेत. हा कार्यक्रम म्हणजेमनोरंजनाची पर्वणीच आहे. कार्यक्रमातील अनेक बदलांबरोबर यामधील परीक्षक देखील बदलले ज्यांनी काहीमहिन्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली. याच कार्यक्रमातील महाराष्ट्राची लाडकी, देखणी आणि आपल्या अदाकारीनेसंपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहा महिन्यामध्ये या परिवाराचा एकमहत्वपूर्ण भाग बनली आहे. याच आपल्या लाडक्या हास्यपरीला म्हणजेच सोनाली कुलकर्णीला कॉमेडीची बुलेटट्रेन मधील कल्लाकारांनी एक छानसं सरप्राईझ दिल, ज्यामुळे सोनालीला खूपच आनंद झाला. सोनालीचावाढदिवस १८ मेला असतो पण कॉमेडीची बुलेट ट्रेन च्या संपूर्ण टीमने तिला सरप्राईझ दिल सेटवर तिच्यासाठीकेक मागविण्यात आला होता, स्टेज फुग्यांनी सजवला होता. तिचा वाढदिवस नक्कीच या टीमने खूप खास बनविलायात शंका नाही

यावर बोलताना सोनाली म्हणाली, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाचा मी आता सहा महिन्यांपासून भाग आहेजणू हा माझा परिवारच आहे अस मला वाटत. माझ्यासाठी कॉमेडीची बुलेट ट्रेन च्या सेटवर येण म्हणजे खूपआनंदाची गोष्ट असते, जसा प्रत्येकासाठी रविवार असतो तसच काहीस माझ्यासाठी इथे या मंचावर येण असत.मला खूप मोठ सरप्राईज होत हे कि, माझा वाढदिवस इतक्या सुंदर प्रकारे माझ्या या सगळ्या मंडळीनी साजरा केला.या मंचावर येऊन मला सकारात्मक दृष्टीकोन मिळाला म्हणजेच छोट्या – छोट्या अडचणीमधून देखील आनंद कसाशोधावा हे कळाल, तसेच विनोदाचे कौतुक करण्याची माझी कुवत वाढली असे मी म्हणेन”. माझ्यावाढदिवसानिमित्त मला तर सरप्राईझ मिळालेच पण आता प्रेक्षकांदेखील लवकरच एक सरप्राईझ मिळणार आहे”.

आपल्या वाढदिवसानिमित्त सोनाली संपूर्ण कॉमेडीची बुलेट ट्रेन च्या टीमला पुण्यामध्ये पार्टी देणार आहे.