मित्रांनो! आज आम्ही सांगणार आहोत एका अशा गायकाबद्दल जो एकेकाळी फक्त ५०० रुपयांमध्ये संपूर्ण शोज करायचा. आपल्या विचित्र कारनाम्यामुळे सदैव वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेला बॉलीवूड सिंगर मिका सिंग आजच्या घडीला मात्र एका गाण्यासाठी घेतोय तब्बल ५० लाख रुपये. मिका सिंगचा जन्म १० जून १९७७ रोजी पश्चिम बंगालच्या दुर्गा येथे झाला. आज ४४ वर्षांचा असणारा हा स्टार सिंगर आजही आहे अविवाहित. लग्न न झाल्याबद्दल त्याने आपला भाऊ दलेरी मेहंदी जबाबदार असल्याचे सांगितले होते.

एका मुलाखतीत मिकाने सांगितले की, सन १९९५ मध्ये मी दलेरभाईच्या टीममध्ये गिटार वादक होतो आणि त्यावेळी एका मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये होतो. माझ्याशी संपर्कासाठी त्या मुलीला मी माझ्या भावाचा लँडलाईन नंबर दिला होता . मिकाने सांगितले होते की , “ एक दिवस त्या मुलीने मला फोन केला. मी उपलब्ध नसल्याने तो माझ्या भावाने उचलला. देव जाणे , दलेरपाजीने तिला काय काय सांगितले. एका झटक्यात तिने माझ्याबरोबर ब्रेक-अप केले.

त्या प्रेमभंगामुळे मी आजही तिच्याच आठवणीत आहे. दलेरपाजी हेच माझे लग्न न होण्यामागचे एकमेव कारण आहे. बॉलिवूड चित्रपटांकरिता एकापेक्षा एक सरस गाणी गाणारा मिका आपल्या आवाजासाठी परिचित आहेच परंतु त्याचा वादांशीही जवळचा संबंध आहे. त्याच्या कारकिर्दीत गाजलेले काही वाद म्हणाल तर…

२००६ मध्ये राखी सावंत हिला स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये जाहीरपणे किस करून त्याने खळबळ उडविली . माध्यमातही या प्रकरणात बरीच चर्चा झाली होती . यानंतर , राखी स्वतः या विषयावर बऱ्याच वेळा बोलताना दिसली . द कपिल शर्मा शोमध्ये मिका सिंगवर बोलताना राखी म्हणाली , मी त्याला प्रसिद्ध केले, नाहीतर त्यांची गाणी कोण ऐकत होतं? मिकाशी संबंधित इतरही अनेक वाद आहेत. जसे हिट अँड रन केस, मॉडेलची छेडछाड, डॉक्टरांना कानाखाली मारणे, बिपाशा बसूशी वाद, कस्टम ड्युटी चुकवणे अशा अनेक वादग्रस्त आरोपांमध्ये तो सहभागी आहे.

आपण जाणतोच की, मिका लोकप्रिय गायक दलेर मेहंदीचा भाऊ आहे. गिटार वादक म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने आपल्या भावासोबत गाणीही रचली. मग त्याने स्वत: गाण्याचा विचार केला. परंतु त्याच्या काहीश्या वेगळ्या आवाजामुळे त्याला बऱ्याच नकारांचा सामना करावा लागला.

बऱ्याच वेळा नाकारल्यानंतर मिकाने स्वत:चा अल्बम लाँच करण्याचा विचार केला आणि पहिले गाणे “सावन में लगे गई आग” हे होते . या गाण्यानंतर त्यांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. त्यानंतर सुरू झालेली त्याच्या आवाजाची जादू आजपर्यंत कायम आहे. एक काळ असा होता की , मिका फक्त 500 रुपयांमध्ये शोज मध्ये गाणी गायचा. पण आता तो एका गाण्यासाठी 20 ते 50 लाख रुपये घेतो.

त्याच्या मालमत्तेबद्दल सांगायचे झाले तर तो सुमारे 450 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. आणि विशेष म्हणजे त्याची बहुतांश कमाई स्वतःच्या स्टेज शोमधून होते. मुंबईच्या अंधेरीमध्ये मिकाचे एक आलिशान अपार्टमेंट आहे. त्याच्याकडे एक आलिशान फार्महाऊस आहे, ज्याची किंमत कोटींची आहे . जर बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींप्रमाणेच त्याच्याकडे खासगी जेट आहे. त्याला गाड्यांचीसुद्धा आवड आहे.

त्याच्याकडे पोर्श पानामेरा , हम्मर, लम्बोर्गिनी, फोर्ड, मर्सिडीज यासारख्या लक्झरी कार आहेत. मिका सिंगने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तसेच अनेक अल्बम तसेच गाणी गायली आहेत. त्याने आपले सपना मनी – मनी, जब वी मेट, ढोल, सिंग इज किंग, इश्कियान, लम्हा, हाऊसफुल, मौसम, बॉडीगार्ड, रेडी, खिलाडी 786, सन ऑफ सरदार, राउडी राठोड, आर.राजकुमार, जंजीर, सुलतान, ड्रीम गर्ल अशा अनेक चित्रपटांत गाणी गायली आहेत .