ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

एका हिंदीतल्या प्रसिद्ध अभिनेत्या सोबत काम केलेली एक लोकप्रिय अशी अभिनेत्री आई झालेली आहे. त्यामुळे सध्या तिच्या व्हिडीओ ला सोशल मीडियावर खूप लाईक केलं जात आहे. व्हायरल होत आहे. तर त्या अभिनेत्याचं नाव आहे, अजय देवगण. आणि अभिनेत्री कोण ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

ब्लॉकबस्टर चित्रपट दृष्यममध्ये अजय देवगणच्या सोबत दिसणारी अभिनेत्री श्रिया सरनने तिच्या गर्भधारणेविषयी खूप मोठा खुलासा केला आहे. एका व्हिडीओ च्या माध्यमातून.

श्रेया या अभिनेत्रीने आता गरोदरपणाबद्दल सुरू असलेल्या सर्व अफवांना अखेर पूर्णविराम दिला आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक गोंडस व्हिडिओ शेअर करून या गुपितातून पडदा काढला आहे.

अभिनेत्री एक वर्षापूर्वीच आई बनली आहे. पण तिने आता ही आनंदाची बातमी तब्बल एक वर्षाने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी चाहत्यांकडून खूप पसंत केलं जात आहे.

याबाबत माहिती देताना अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पती आणि मुलीसोबत दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना श्रियाने कॅप्शनमध्ये लिहिले – हॅलो मित्रांनो, वर्ष २०२० मध्ये माझे क्वारंटाईन खूप सुंदर आणि वेडेपणाने भरलेले होते. त्या वेळी जेव्हा संपूर्ण जग एका वेगळ्याच उलथापालथातून जात होते, अडचणीत होतं; तेव्हा माझे जग वेगाने आनंदाच्या दिशेने बदलले होते. या दरम्यान आम्हाला भेट म्हणून एक सुंदर देवदूत मिळालेला आहे, ज्यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो.

श्रिया सरनने 2018 मध्ये राजस्थानमध्ये आंद्रे कोश्चेव्हशी लग्न केले. मालदीवमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले. लग्नानंतर तिच्या गर्भधारणेबद्दल अनेक अफवा ऐकल्या जात होत्या.

लग्नानंतर ती पतीसोबत बार्सिलोना, स्पेनमध्ये राहत होती. तसेच, अभिनेत्री 2020 मध्ये तिच्या पतीसह भारतात परतली आहे. त्याचबरोबर, आई झाल्यापासून श्रिया तिच्या आयुष्यातील या नवीन अनुभवाचा आनंद घेत आहे.

श्रिया सरन साउथ इंडस्ट्रीच्या मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2001 पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. श्रियाचा पहिला हिंदी चित्रपट तुझे मेरी कसम होता, ज्यात ती जेनेलिया आणि रितेश देशमुख यांच्या सोबत काम करताना दिसली होती. यानंतर, ती 2007 मध्ये इमरान हाश्मीसोबत अवर्णन चित्रपटात दिसली.

याशिवाय ती बॉलिवूडच्या अनेक आयटम साँगमध्येही दिसली आहे. त्याचसोबत तिला अजय देवगणच्या दृष्यम या चित्रपटातून मोठे यश आणि प्रसिद्धी मिळाली. कामाच्या आघाडीवर असताना, तिचाचा शेवटचा हिंदी चित्रपट सब कुशल मंगल हा होता. सध्या, ती आरआरआर चित्रपटासह काही प्रकल्पांचा एक भाग आहे.

श्रियाचे पती आंद्रे हे रशियन टेनिसपटू आणि उद्योजक आहेत जे बार्सिलोनामध्ये राहत होते. मात्र, आता तो श्रियासोबत भारतात शिफ्ट झाले आहेत. एका मुलाखतीत आंद्रेची स्तुती करताना श्रेया म्हणाली की देवाने माझ्यावर दया केली आणि मला आंद्रेसारखा उत्तम साथीदार दिला.