मित्रांनो!, बॉलीवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खान Shahrukh Khan हा सध्या बऱ्याच काळापासून मोठ्या स्क्रीनवरून गायब आहे. पण या किंग खानचा दबदबा अद्यापही बॉलीवूड सिने इंडस्ट्रीत कायम आहे. याचमुळे केवळ किंग खानच नाही तर त्याची अख्खी फॅमिली सुद्धा सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते.

शाहरुख खानची पत्नी गौरी खान Gauri Kkhan हिची इंडस्ट्रीत एक वेगळीच ओळख आहे. इंडस्ट्रीतील एक नामवंत इंटिरिअर डिझाईनर म्हणून ती ओळखली जाते. शेवटी सांगायचं काय तर शाहरूख व गौरी खान दोघेही आपआपल्या क्षेत्रांमध्ये टॉप प्लेअर आहेत. परंतु त्यांच्या आलिशान ‘मन्नत’ या बंगल्याच्या आत मात्र चित्र जरा वेगळेच असल्याचे समोर आले आहे.

होय, भलेही शाहरुख बॉलिवूडचा बादशाह असेल, पण घरात ‘मन्नत’मध्ये Mannat मात्र त्याच्या सासूबाईंचाच हुकूम चालतोय. होय!, किंगखान काय आणि गौरी काय, दोघेही तिच्यापुढे ब्र सुद्धा काढत नाहीत. होय, वाचून जरा आश्चर्य वाटेल पण, शाहरूख आणि गौरी यांच्या घराची सर्वस्वी जबाबदारी गौरीची आई म्हणजे शाहरुखच्या सासूबाई सविता चिब्बर Savita Chibber या एकहाती सांभाळतात.

खुद्द गौरीनेच एका मुलाखतीत नुकताच हा खुलासा केला होता. यातही विशेष म्हणजे गौरीची आई दिल्लीत राहते. पण दिल्लीतून त्या व्यवस्थित मुंबईचा सगळा कारभार बघतात. गौरी आणि शाहरुख दोघेही आपापल्या कामानिमित्त फारच व्यग्र असतात.  सबब त्यांना घराकडे फार जास्त वेळ देता येत नाही.  अशा वेळी मग घरातील प्रत्येक कामावर सविताजी बारकाईने लक्ष ठेवतात. घरातील  सगळ्या स्टाफवर त्यांचा जबरदस्त वचक आहे.

त्यांच्याकडून काम करवून घेणे, त्यांना रिमोटली मॅनेज करणे, ही सगळी जबाबदारी त्याच बघतात. त्यामुळे त्या सतत व्हॉट्सअप व  फोनवर असतात. मन्नत बंगल्याची सूत्र ही सविता यांच्याच हातात आहेत.गौरीने स्वत: एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. त्यावेळी ती म्हणाली  होती की, “माझी आई माझा सगळ्यांत मोठा आधार आहे. ती माझ्या घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळते.

अगदी दिल्लीत बसून सर्व काही मॅनेज करते. तिच्यामुळे मी आणि शाहरूख दोघेही निश्चिंतपणे आपआपले काम करू शकतो. माझ्यासारख्या वर्किंग वुमनसाठी घर आणि काम दोन्ही सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणे हे खरेतर अतिशय तणावपूर्ण असते. अशावेळी आई किंवा सासू दोघींपैकी एक असतील तर तुमच्या संसारातील अनेक गोष्टी अतिशय सोप्या होऊन जातात.

शाहरूख खानचा सिनेइंडस्ट्रीत कोणीच गॉडफादर नव्हता. जेव्हा किंग खानने इंडस्ट्रीत पाउल टाकले त्यावेळी त्याच्याकडे कोणाचाच शिफारस नव्हता. त्याने स्वतःच्या हिमतीवर यश संपादन केले आहे. छोट्या पडद्यापासून कारकीर्दीची सुरूवात केली मग निगेटिव्ह भूमिका केल्या. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले.

शाहरुख खान शेवटचा २०१८ मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात झळकला होता. आता लवकरच तो ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. आत्ता नुकतीच बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला सिनेइंडस्ट्रीत नुकतेच ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरूख खानने २५ जून १९९२ रोजी ऋषी कपूर, दिव्या भारती यांच्यासोबत दीवाना चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या निमित्त शाहरुख खानने ट्विट केले की, ‘मला तुमचे प्रेम ३० वर्षांपासून मिळत आहे आणि आजही तुमचे हे प्रेम कायम आहे. माझ्या आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक काळ मी तुमच्या सर्वांचे मनोरंजन केले आहे, हे आज लक्षात आले. मी वेळात वेळ काढून सर्वांचे आभार मानणार आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची खूप गरज आहे.’