मराठी मालिका हा रसिकांसाठी नेहमीच आवडीचा विषय असतो. संध्याकाळी आपल्या घरात मालिका ही लागणारच आणि काही काळाने आपण देखील त्या पात्राशी भावनिक होतो. अशीच एक मालिका आज-काल खूपच गाजत आहे त्या मालिकेचं नाव आहे ” माझ्या नवऱ्याची बायको ” या मालिकेमधील सर्वांचा लाडका मित्र, तो आला की तिथल्या वातावरणात चैतन्य निर्माण होतं.

जीव लावणारा, मदत करणारा, मजा मस्ती करणारा आणि वेळ आली तर समोरच्याला चांगलाच धडा शिकवणारा म्हणजेच सौमित्र हे पात्र ज्या अभिनेत्याने साकारले आहे त्याचे नाव आहे आद्वैत दादरकर.

आद्वैत दादरकर त्याच्या कमालीचा अभिनयामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत सौमित्र राधाला नेहमीच मदत करत असतो आणि सौमित्रच राधा वरती प्रेम देखील असतं. आत्ताच काही दिवसांपूर्वी राधा आणि सौमित्रच लग्न देखील या मालिकेमध्ये झालं आहे. पण, आपल्या रसिकांना मालिके सोबतच सौमित्रच्या खऱ्या आयुष्याबद्दल देखील जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये त्याचे लग्न देखील झालेले आहे. त्याची पत्नीदेखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनेही हजारो रसिकांची मने जिंकली आहेत. आद्वैत दादरकर याच्या पत्नीचे नाव आहे भक्ती देसाई.अद्वैतने त्याची अभिनयाची सुरुवात मराठी रंगभूमी वरती केलेली आहे. त्याचे मराठी नाटकांमध्ये मोठे योगदान आहे.

याच मराठी रंगभूमीवर त्याच्या पत्नीने देखील काम केले आहे. तीदेखील नाटकांवरील कामासाठी प्रसिद्ध आहे. तीच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सध्या ती प्रसाद ओक दिग्दर्शित आणि प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या ” तू म्हणशील तसं ” या नाटकासाठी काम करत आहे. या नाटकामध्ये तिच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे देखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करत आहे. या नाटकातील भक्तीच्या अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होताना दिसत आहे.

भक्तीने नाटकांसोबतच मराठी छोट्या पडद्यावर देखील अभिनय केलेला आहे. अरुंधती नावाची एक मालिका केलेली आहे. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये दिसली होती. आव्दैत आणि भक्ती या दोघांना एक गोड मुलगी आहे मीरा असे तिचे नाव आहे. मीरा देखील दिसायला खूपच गोड आणि सुंदर आहे.

अद्वैत आणि भक्ती हे दोघेही एकत्रच कॉलेजमध्ये होते. अद्वैत कॉलेजमध्ये असताना नाटकांचं दिग्दर्शन करत असे तर भक्ती अभिनय करायची. या नाटकांच्या प्रयोगांमधून त्यांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही वर्षांपूर्वीच त्यांनी लग्न देखील केलेले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.