वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. याशिवाय मनुक्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन कशापद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात…

ज्या लोकांचा नेहमी रक्तदाबकमी असतो, त्यांना ब्रेन हेमरेजचा धोका जास्त असतो. जर आपल्याला रक्तदाब संतुलित ठेवायचा असेल तर दररोज मनुक्याचे सेवन करावे.

मनुका पाचन शक्ती वाढविण्यात मदत करते. हे खाल्ल्याने आतड्यातील गॅस काढून टाकला जातो आणि आपल्याला भूक लागते. जर आपल्याला पचन क्रिया व्यवस्तिथ ठेवायची असेल तर दररोज मनुक्याचे सेवन करावे.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.

झोपण्याच्या एक तास आधी उकळेल्या दुधामधून मनुक्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खास करुन बद्धकोष्टावर हा उपाय करुन पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.

मनुकामधील फ्लैवनॉल्स आणि तांबे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करतात. दररोज त्याचे सेवन केल्यास कर्करोगासारख्या जीवघेणा रोगाचा धोका कमी होतो. पोटाच्या कॅन्सरमध्ये हे खूप फायदेशीर आहे.

मनुकामध्ये फैट कमी असते जे हृदयासाठी खूप चांगली असते. त्याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलचा कोणताही त्रास होत नाही आणि आरोग्यही चांगले राहते.

मॅग्नेशियम युक्त मनुका मज्जातंतू पेशींमध्ये कॅल्शियम पोहोचविण्याचे कार्य करते. यामुळे मज्जातंतूंवर फारच कमी दबाव येतो. जेव्हा शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा कॅल्शियम मज्जातंतूपर्यंत पोहोचू लागते. यामुळे रक्तवाहिन्या आणि नसा अरुंद झाल्याने मायग्रेनचा त्रास होतो.

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.