बॉलीवूड मध्ये नवीन तसेच दमदार चित्रपट येत्या वर्षाभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटांपैकीच एक चित्रपट म्हणजे बागी 3. या चित्रपटाचे दोन भाग या आधी प्रदर्शित झालेले आहेत.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बर्‍यापैकी कमाई करून गेलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटामध्ये कोण कोण काम करणार आहे त्यासाठी त्यांनी किती मानधन घेतलेलं आहे.

श्रद्धा कपूर : आज बॉलीवुड मध्ये सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. या चित्रपटामध्ये श्रद्धा मीरा नंदन नावाचे पात्र साकारणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनय करण्यासाठी श्रद्धा कपूरने तब्बल सहा करोड रुपये एवढी तगडी फीस घेतलेली आहे.

रितेश देशमुख : आपल्या अभिनयाने आणि हसतमुख स्वभावाने प्रत्येकाला भुरळ घालणारा हा मराठमोळा अभिनेता. मित्रांनो रितेश देशमुख देखील या चित्रपटामध्ये काम करणार आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुखने अजय प्रताप सिंह नावाचे पात्र साकारणार आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी रितेश देशमुख याने तब्बल 20 करोड रुपये एवढी आकारली आहे.

चंकी पांडे : मित्रांनो अनेक चित्रपटांमध्ये चंकी पांडेने महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या अभिनयाची छाप या सिनेसृष्टीवर सोडलेली आहे. या चित्रपटामध्ये देखील चंकी पांडे एक महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी चंकी पांडे याने तीन करोड रुपये घेतलेली आहे.

टायगर श्रॉफ : याने कमी काळामध्ये बॉलीवूडमध्ये आपला जम बसलेला आहे. टायगर श्रॉफने याआधी अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. टायगर श्रॉफ त्याच्या ॲक्शन साठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहे. या चित्रपटामध्ये देखील टायगर श्रॉफ प्रमुख भूमिका करताना दिसून येईल. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी त्याने तब्बल 35 करोड रुपये एवढी फीस आकारली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.