बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने एका मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक घटनांचा उलगडा केला आहे. यावेळी तिने तिची आणि अजय देवगणची पहिली भेट त्याचबरोबर त्यांच प्रेमात झालेलं रुपांतर आणि लग्नासंबंधित काही गोष्टी सांगितल्या. यावेळी तिने आपला दोनवेळा गर्भपात झाल्याचा खुलासा करत आपल्या आयुष्यातील त्या खडतर प्रवासांबद्दल गोष्टी शेअर केल्या.
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार कपल काजोल (Kajol) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांची ‘तान्हाजी’ सिनेमाच्या निमित्तानं चर्चा जोरावर आहे. दोघंही सध्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशा वेळी काजोलनं आपल्या खऱ्या आयुष्यातील एक दुखरी घटना पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांशी शेअर केलीय.
“२००१ मध्ये कभी खुशी कभी गम चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मी गर्भवती होती. पण माझा गर्भपात झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत होता तेव्हा मी रुग्णालयात होते. माझ्यासाठी ती आनंदाची वेळ नव्हती. त्यानंतर माझा अजून एकदा गर्भपात झाला. माझ्यासाठी तो खपूच कठीण काळ होता,” असं काजोलने मुलाखतीत सांगितलं आहे.
काजोलने अजय देवगणसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण शेअर करत म्हणाली की, ‘ 25 वर्षांपूर्वी ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर आमची पहिली भेट झाली. मी शूटसाठी तयार झाले होते आणि मी विचारले की माझा हिरो कुठे आहे? कोणीतरी अजयकडे बोट दाखविले. तो एका कोपऱ्यात शांत बसला होता. त्याला भेटण्याच्या 10 मिनिटे आधी मी त्याच्याबद्दल गॉसिप करत होते. सेटवर आम्ही बोलू लागलो आणि लगेच आमच्यात मैत्री झाली.’
“आम्ही दोघंही त्यावेळी वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते. मी अजयकडे माझ्या प्रियकराची तक्रारदेखील केली होती. पण लवकरच आमच्या दोघांचाही ब्रेक अप झाला. आमच्या दोघांपैकी कोणीही प्रपोज केला नाही, पण आपण एकत्र आहोत हे दोघांनाही माहिती होतं. हात पकडण्यापासून सुरु झालेलं नातं आम्हाला कळण्याआधी फार पुढे गेलं होतं,” असं काजोलने सांगितलं आहे.
अजय देवगणचा ‘तान्हाजी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून यामध्ये अजय देवगण छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे तान्हाजी मालुसरे यांची भूमिका निभावत आहे. चित्रपटात काजोल आणि सैफ अली खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.