कष्ट हेच फळ. आणि दुःख किंवा काट्याच्या वाटा वरून गेल्याशिवाय इथे पर्याय ही नाही. अनेक कलाकार खूप संघर्ष करून मोठे होत असतात. यात एक आहे मराठी आणि दुसरी आहे बॉलिवूड अभिनेत्री.
यांनी आपल्या सं’घ’र्षाच्या वाटेवर कष्ट फेरून त्याच्या फळावर त्यांनी विजय मिळवला आहे आणि याच सोबत त्यांची प्रेमकहाणी ही आपल्याला माहीत होणार आहे. जे आज जरी एकत्र नसेल तरी तेव्हा होऊ शकत होते. ते कोण ? तर चला मग जाणून घेऊयात.
चला तर मग आज तुम्हाला अशा एका अभिनेत्रीची ओळख करून द्यायची आहे जिने आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच हालअपेष्टा सहन केल्या आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे “सारिका ठाकूर”. ३ जून १९६२ रोजी दिल्ली येथील मराठी- हिमाचली कुटुंबात सारिकाचा जन्म झाला. तिथे जन्म झाला असला तरी तिची ओढ मुंबई होती. कारण इथेच तिच्या कलेला वाट मिळणार होती.
दु’र्दै’वी आयुष्य कसं असतं बघा म्हणजे सारिका लहाण असतानाच वडील घर सोडून कुठेतरी निघून गेले. घरची परिस्थिती हालाकीची झाल्याने तिला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका मिळाली. मुलगी असूनही “मास्टर सूरज” या मुलाची भूमिका तिने साकारली. आणि ती खूप लोकप्रियझाली आणि तिथंच तिचा प्रवास सुरु झाला.
छोटी बहू, बडे दिलवाला, अकलमंद, रझिया सुल्तान अशा अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून एका आघाडीच्या नाईकांमध्ये आपले नाव कोरले. चित्रपटात काम करून मिळालेला पैसा तिची आई कमल ठाकूर कडे सुपूर्त करत. मग पुढे काय होतं तेही खाली वाचाच.
एवढेच नाही तर अगदी प्रॉपर्टी, घरदार सर्व आईच्याच नावे तिने करून दिले होते. सारिकाने सचिन पिळगावकर ह्यांच्यासोबत गीत गाता चल, जान ए बहार, मधू मालती, रक्षाबंधन, जाये तो जाये कहा सारख्या तब्बल १२ चित्रपटात एकत्रित काम केले. एकत्र काम आणि मग प्रेम आणि पुढं आयुष्य नाहीतर ब्रे’क’अ’प हे समीकरण चं बनलेलं आहे जसं.
अनेक चित्रपटातील त्यांच्या जोडीला विशेष पसंती देखील मिळाली. ह्याचाच परिणाम म्हणून त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. याचं रूपांतर प्रेमात झालं.
आवडते होते चाहत्यांचे आणि एकमेकांचे. दोघेही एकमेकांना पसंत असताना लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले. परंतु सारिकाच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. लग्नानंतर सारिकाचे करिअर संपुष्टात येण्याच्या भीतीने त्यांनी या लग्नाला वि’रो’ध दर्शवला.
यानंतर सारिका मनातून पूर्णपणे ख’चू’न गेली. पुढे काही वर्षाने सारिका मुंबई सोडून मद्रासला निघून गेली. तिथे आपला जम बसवत असताना दाक्षिणात्य सुपरस्टार “कमल हसन ” सोबत तिची मैत्री झाली. आणि मग काय तिचा प्रवास कमल हसन कडे हसतमुख सुरू झाला. असेच असतं एक गेला की दुसरा. सचिन नंतर कमल आणि आता ?
कमल सोबत असलेल्या या मैत्रीचे प्रेमात आणि पुढे लग्नात रूपांतर झाले. १९८८ साली सारिका आणि कमल हसन लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाआधीच सारिकाने मुलगी “श्रुती ” हिला जन्म दिला असल्याचे सांगितले जाते. श्रुती हसन दाक्षिणात्य चित्रपटातील टॉप ची अभिनेत्री म्हणून नाव कमवत आहे. श्रुती आणि अक्षरा ह्यांच्या जन्मानंतरही सारिकाने चित्रपट क्षेत्रात आपले काम चालूच ठेवले. पण म्हणतात ना की मन जुळले तर आयुष्य जुळेल. त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. धड सचिन नाही आणि कमल ही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.