अशोक पंक्तींची सुमधुर गाणी आणि लावणी स्पेशल एपिसोड प्रेक्षकांची मन जिंकणार !!! १२ एप्रिल आणि १३ एप्रिलला सरगममुळे प्रेक्षकांना एक सुरेल पर्वणी मिळणार

Zee Yuva Sargam झी युवावरील सरगम हा कार्यक्रम घराघरात बघितला जातोय . सरगम नवीन नवीन उचांक गाठतोय . या आठवड्याडील सरगम मधील दोन्ही भाग अतिशयवेगळे आणि दर्जेदार आहेत . पहिल्या भागात सुमधुर संगीत तर दुसऱ्या भागात अप्रतिम लावण्या आपल्याला अनुभवायला मिळतील . अशोक पत्की ह्या  नावाने गेली  चार दशके  मराठी संगीत क्षेत्रातील लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. १९६९ या वर्षी अशोकजींनी  मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि तेव्हापासूनच केवळनाटके नव्हे तर अनेक पारितोषिक पात्र  सिनेमांचे त्याचप्रमाणे टीव्ही शो च्या संगीताचे काम केले आहे . आजवर त्यांनी ५० सिनेमे , ५०० भक्तिगीते तर २५०नाटकांना संगीत दिले आहे . अशी संगीत क्षेत्रातील व्यक्ती जेव्हा सरगम सारख्या संगीतमय कार्यक्रमात येते तेव्हा अनेक सुमधुर गीते प्रेक्षकांना अनुभवायला मिळतीलत्याच प्रमाणे अनेक दुर्मिळ किस्से सुद्धा ऐकायला मिळतील .  या आठवड्यात बुधवार १२ एप्रिल अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेल्या सदाबहार गाण्याच्या कार्यक्रमानेरंगणार आहे .आणि  गुरुवार १३ एप्रिलला सरगममध्ये एक वेगळा प्रयोग होणार आहे . मराठीमधील अप्रतिम  लावण्या प्रेक्षकांना  पहायला मिळणार आहेत .

सरगम या कार्यक्रमात अशोक पत्कींच्या पहिल्या भागात केतकीच्या बनी तिथे , तू सप्तसूर माझे , दिस चार झाले मन , झी मराठी सिरीयल टायटल , ढगदाटुनी येतात , राधे कृष्ण  नाम आणि मिळे सूर मेरा तुम्हारा ही गाणी असून या भागात माधुरी करमरकर , मंदार आपटे , साधना सरगम , कल्याणी साळुंखे आपटे , हृषीकेश रानडे हे गायक आपली कला सादर करणार आहेत .  आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहेत तर लावणी स्पेशल भागात कसं काय पाटील बरं हाय का , पाडालापिकलाय आंबा , पिंगा , इंद्रपुरीच्या मेनका नी  रंभा , झाल्या तिन्ही सांजा , या रावजी , तुम्हावर केली मी मर्जी बहाल , पसारा आली आणि वाजले कि बारा ह्या लावण्याअसणार आहेत . आणि जुईली जोगळेकर , वैशाली माडे , प्रवीण कुंवर , सुरेखा  पुणेकर हे गायक त्यांच्या अप्रतीम आवाजाने लावण्या गाणार आहेत .सरगम चा हाकार्यक्रम  बुधवार १२ एप्रिल  आणि गुरवार १३ एप्रिल  रात्री ९ वाजता  प्रेक्षकांना एका वेगळ्याच माहोलात नेऊन ठेवणार आहे .

सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत .“सरगम” या कार्यक्रमाच्यासूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे  शीर्षक गीतशंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणिगुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.