झी युवाच्या “फुलपाखरू ” टीमची ठाण्याच्या ” फुलपाखरू ” टीम ला खास भेट

डिप्रेशन लेट्स टॉक या डब्ल्यूएचओच्या वार्षिक मध्यवर्ती संकल्पनेचे उद्घाटन

९ एप्रिल, रविवार, ठाणे : सिद्धांत प्रतिष्ठान यांच्यातर्फे  ठाणे महानगरपालिका आणि ठाणे मनोरुग्णालय यांच्या सहकार्याने   ९ एप्रिल रोजी ठाण्यातील तीन हात नाका येथे सिद्धांत प्रतिष्ठानच्या Phulpakharu  ‘फुलपाखरू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. झी युवा या कार्यक्रमाचे चॅनेल पार्टनर होते .  यंदाच्या जागतिक आरोग्य दिनासाठी डब्ल्यू. एच. ओ.ची मध्यवर्ती संकल्पना असलेल्या ‘डिप्रेशन लेट्स टॉक’ या मध्यवर्ती संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित होता.

सिद्धांत प्रतिष्ठानचा Phulpakharu ‘फुलापाखरू’ हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. सामाजिक अवघडलेपण न बाळगता लोकांना आपल्या चिंतांबाबत मोकळेपणे बोलावे यावर Phulpakharu ‘फुलपाखरू’ मध्ये भर देण्यात आला होता. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना नैराश्याने ग्रासले आहे त्यांना मदत करण्यासाठी काळजीवाहकही या ठिकाणी उपस्थित होते. आपुलकीच्या वातावरणात नैराश्याशी लढा देण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि व्यावसायिक समुपदेशकांनी या वेळी वैयक्तिक नि:शुल्क सत्रे घेतली.

या कार्यक्रमात मानसिक आणि शारीरिक फिटनेसचा समतोल राखणाऱ्या अॅक्टिव्हिटींचे आयोजन करण्यात आले होते. यात डान्स वॉकेथॉन, सायकलोथॉन, बाईकेथॉन, म्युझिकल फिटनेस, म्युझिक थेरपी, लाफ्टर थेरपी, ध्यानधारणा आणि योग या अॅक्टिव्हिटींचा समावेश होता. त्याचप्रमाणे ठाणे मनोरुग्णालयातील संस्थावासीयांनी नैराश्यावर रचलेला शॅडो अॅक्ट, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, फ्लॅश मॉब इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल होती. योगायोगाने झी युवाचा नवीन येणाऱ्या कार्यक्रमाचे नावही Phulpakharu  ” फुलपाखरू आहे . ठाण्याच्या या अश्या वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला फुलपाखरू मालिकेतील फुलपाखरू वैदेही म्हणजेच ऋता दुरगुळे आणि या मालिकेद्वारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री पूर्वा गोखले यांनी आवर्जून हजेरी लावली .

पूर्वा ही  ठाणेकरच आहे त्याचप्रमाणे सध्या या मालिकेची शूटिंग सुद्धा ठाण्यातच सुरु आहे .सध्या फुलपाखरू मालिकेचे ट्रेलर तरुणाईत फारच वायरल झाले असून या मालिकेचा हिरो नक्की कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये ताणली जात आहे .त्यामुळे असहप्रकरचा उत्तम योगायोगामुळे  झी युवाच्याPhulpakharu  “फुलपाखरू “ टीमने  ठाण्याच्या  या अनोख्या Phulpakharu  ” फुलपाखरू ” च्या टीम ला खास भेट दिली . या दोघीनींही या कार्यक्रमासाठी आलेल्या ठाणेकरांना फुलपाखरासारखा दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पसरवा आणि आमची येणारी मालिका पाहून आयुष्यातील सगळी दुःखे विसरण्याचा सल्ला दिला . त्याचप्रमाणे  ठाण्याच्या ” फुलपाखरू ” कार्यक्रमातील इतर ऍक्टिव्हिटी मध्ये भागही घेतला .