सध्या रोमँटिक गाण्यांची जणू स्पर्धाच लागली आहे. आणि याच प्रेमाच्या गाण्यांची झलक प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याला घट्ट बांधून ठेवण्यास मदत करताना आपण पाहतोच.प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येक दिवस प्रेमाचाच असतो. आणि त्या प्रेमाच्या दिवसात प्रेमाची आठवण म्हणून अशा प्रेमाच्या दिवसात फूल दिले जाते. प्रियकर-प्रेयसी एकमेकांना गिफ्ट्सही देतात. अशा वेळी एखादं रोमँटिक गाणं बॅकग्राऊंडला सुरु असलं की एक वेगळीच भावना मनात निर्माण होत असते. याच गाण्याच्या बोलांवर हे जोडपे ठेके धरू लागतात.

तरुण तरुणींच्या स्वप्नातही आपल्या प्रियकराला भेटण्यासाठीची सतावणारी ओढ, आणि त्या रात्रीच्या स्वप्नात रंगून जात, एकमेकांच्या आठवणीत रमून जात गेलेल्या त्या रात्रीचे रोमँटिक शब्दात असे वर्णन चेतन गरुड प्रॉडक्शन प्रस्तुत आणि उमाकांत पुष्पराज येले दिग्दर्शित ‘सपान रातीला पडलं’ या गाण्यातून करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेता शेखर दर्षले आणि अभिनेत्री प्रांजली कंझरकर यांनी मुख्य भूमिका वठवली आहे. या गाण्याची कथा, पटकथा चेतन रवींद्र गरुड लिखित असून या रोमँटिक गाण्याला गायक युवराज मेढे याने आवाज दिला आहे. तर मनीष कासारे आणि सचिन साळवे या गाण्याला संगीत दिग्दर्शक म्हणून लाभले, तर दयानंद कासारे लिखित या गाण्याचे बोल आहेत. सोशल एंटरटेनमेंट पार्टनर म्हणून सध्या जोरदार चर्चा असणार्या टिकटॉक ऍपने या गाण्याची बाजू सांभाळली आहे. तर या संबंध गाण्यात डिओपी पदावर कार्यरत असणाऱ्या रवी उच्चे यांनी उत्कृष्ट कामगिरी पेलवली.

रोमँटिक आणि प्रेमाच्या बंधात बांधून ठेवणारे असे ‘सपान रातीला पडलं’ हे गाणे प्रेक्षकांसाठी आणि प्रेमीयुगुलांकरिता एक पर्वणीच