बॉलीवूडच्या भाईजानचे म्हणजेच सलमान खानचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहून पाहून कंटाळले आहेत.  अभिनेता आता 56 वर्षांचा झाला असेल, पण आजही त्याचे चाहते विचारत आहेत की तो लग्न करणार का? या लेखाच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सलमान खान अजूनही अविवाहित का आहे?

बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खान इंडस्ट्रीवर तसेच त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. भाईजानचे चाहते त्याला खूप फॉलो करतात. इतकंच नाही तर त्याचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झाला आहे किंवा होणार आहे, तेव्हा चाहत्यांना त्याच्या चित्रपटांची खूप उत्सुकता लागलेली असते. सध्या सलमान खान त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये बराच व्यस्त आहे, ज्यामध्ये त्याचे ‘टायगर 3’, ‘कभी ईद कभी दिवाळी’ आणि अनेक चित्रपट चर्चेत आहेत.

याशिवाय सलमान त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही सतत चर्चेत येतच असतो. सलमान खान केव्हा लग्न करणार हे सलमानच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. सलमान खानचे नाव अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले तरी आजच्या काळात तो एकटाच म्हणजेच अविवाहित आहे.

खरं तर, एका मुलाखतीदरम्यान, सलमान खानचे वडील सलीम खान यांनी त्यांच्या मुलाची एक कमतरता सगळ्यांसमोर सांगितली होती. सलीम खानने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘ही एक अशी कमतरता आहे, ज्यामुळे सलमान नेहमीच अविवाहित राहणार असेल आणि तो कधीही लग्न करू शकणार नाही’.

त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल खुलेपणाने सांगितले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, सलमान खानच्या एका चुकीमुळे तो नेहमीच अविवाहित राहील. सलीम खान म्हणाले होते की, ‘जर सलमान खान आजच्या काळात अविवाहित असेल तर त्याला तो स्वतः जबाबदार आहे.

सलीम खान पुढे म्हणाले की, ‘माझा मुलगा कधीही कोणाच्या प्रेमात पडला नाही आणि म्हणूनच तो आज बॅचलर आहे’. सलमान खानबद्दल सांगायचं झालं, ‘जोपर्यंत सलमान खान कोणाच्या तरी प्रेमात पडत नाही तोपर्यंत तो बॅचलरच राहील आणि सलमान खानला त्याची ही कमतरता दूर करावी लागेल’.

दुसरीकडे, जर आपण सलमानच्या अनेक नात्याबद्दल बोललो तर त्याच्या नावापुढे पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय, कतरिना कैफसह अनेक टॉप अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. बातम्यांनुसार, सलमान खानचे नाव विदेशी मॉडेल युलिया वंतूरसोबतही जोडले गेले आहे. असो, या व्यतिरिक्त तो लवकरच अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.