बॉलीवूडमध्ये नाव कमवण्यासाठी टॅलेंटसोबतच गुड लुकिंग असणंही खूप महत्त्वाचं समजल जातं आणि ते अतिशय महत्वाचं आहे सुद्धा. सध्या असे अनेक स्टार्स आहेत जे जवळपास ३ दशकांपासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या वयाचा प्रभाव हा काही त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही.
पण खरी गोष्ट तर अशी आहे की हे स्टार्स पडद्यावर खूपच जास्त मेकअप करताना दिसतात. मेकअपशिवाय या स्टार्सना पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आज या लेखात आम्ही फिल्म इंडस्ट्रीतील 7 सुपरस्टार्सचे मेकअपशिवाय असलेले फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
1) सलमान खान : 56 वर्षांचा सलमान खान आजही बॉलिवूड इंडस्ट्रीवर आणि त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. पण आता त्याच्या वयाचा प्रभाव हा त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे. चित्रपटाच्या पडद्यावर दिसण्यापूर्वी त्यांना मेकअपचा बराच अवलंब करावा लागतो. अलीकडेच त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याच्या पांढर्या मिशा आणि तिरकस केस दिसत होते.
२) गोविंदा : गोविंदा हा असाच एक अभिनेता आहे ज्याने आपल्या लूक आणि नृत्य कौशल्याने चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. पण मेकअपशिवाय या अभिनेत्याचा चेहरा तुम्ही पहिला तर तुम्हाला तो आश्चर्यचकित करू शकतो.
3) अभिषेक बच्चन : ज्युनियर बच्चन अभिषेक हा देखील इंडस्ट्रीतील एक दमदार अभिनेता आहे. चित्रपटांमध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व देखील खूप चांगले आहे पण वास्तविक जीवनात मात्र तो आता म्हातारा दिसू लागला आहे.
4) आमिर खान : आमिर खान एक असा अभिनेता आहे जो त्याच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी अतिशय जास्त मेहनत घेत असल्याचं आपल्याला दिसत आणि 2-3 वर्षात तो एखादाच चित्रपट करतो. हे कलाकार त्यांच्या लूक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण आता या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर देखील मेकअपशिवाय म्हातारपण लगेच दिसून येते.
५) रजनीकांत : रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा देव म्हटले जाते. रजनीकांत आता 71 वर्षांचा झाले आहेत, परंतु ते त्यांच्या चित्रपटांमध्ये मेकअपच्या आधारावर अतिशय तरुण दिसू लागतात.
6) अक्षय कुमार : अक्षय कुमार हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात फिटनेस फ्रीक अभिनेता असल्याचं मानला जातो. चाहत्यांना त्याचे अॅक्शन सीन्स खूप आवडतात पण सत्य हे आहे की तो सुद्धा आता म्हातारा झाला आहे पण मेक-अपच्या जोरावर तो इंडस्ट्रीत कायम टिकून आहे.
7) शाहरुख खान : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हा इंडस्ट्रीतील सर्वात हँडसम आणि हॉट अभिनेता मानला जातो, परंतु जेव्हा तुम्ही या अभिनेत्याला मेकअपशिवाय पाहाल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.