अतिशय वेगळ्या पद्धतीने बिनधास्त फोटोशूट करून आपल्या शरीरातील व्यंग लपवण्याचा प्रयत्न न करता त्यावर जाहीरपणे व्यक्त होण्याचा धाडसीपणा काही मराठी कलाकार आजच्या घडीला दाखवत आहेत. अशाच एका अनोख्या आणि अभिनव संकल्पनेसाठी ‘सैराट’ चित्रपटातील लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गलगुंडे याने न्यू*ड फोटोशूट केलं आहे. ‘सैराट’ फेम लंगड्या म्हणजे तानाजी गलगुंडेने केलं न्यू*ड फोटोशूट. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र रंगली आहे तानाजीच्या या अनोख्या फोटोची चर्चा. स्वतःच्या शरीराबद्दलची सकारात्मकता यासाठी केलं आहे त्याने हे खास फोटोशूट.

आपलं शरीर ही निसर्गदत्त दैवी देणगी असते, असं मानलं जातं. पण एखाद्याच्या शरीरात काही व्यंग असेल तर मात्र त्याच्याकडे एकतर सहानुभूतीच्या किंवा तिरस्काराच्या नजरेने पाहिलं जातं. परंतु, आमचं शरीर जसं आहे तसंच ते आम्हाला आवडतं असं ठामपणे सांगण्याचे धाडस फार कमी जणांमध्ये असते. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री वनिता खरात हिने न्यू*ड फोटोशूट करत प्रेक्षकांची झोप उडवली होती. वनिताच्या शरीराबद्दल बोलणाऱ्या व्यक्तींची तिने एकाच न्यू*ड फोटोशूटमुळे बोलती बंद केली होती. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने वनिताच्या पावलावर पाऊल ठेवत प्रेक्षकांना त्याच्या शरीराकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे.

तगड्या कथानकातून आणि नवोदित तरीही उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयातून तयार झालेला नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा मराठी चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटातील लंगड्याचं पात्र साकारणारा तानाजी गलगुंडे हा सुद्धा चांगलाच गाजला होता. हाच तानाजी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तानाजीने नुकतंच न्यू*ड फोटोशूट करत सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

रावण फ्युचर प्रोडक्शनसाठी तानाजीने हे फोटोशूट केलं आहे. या फोटोत न्यू*ड तानाजी गलगुंडे हा गिटार घेऊन उभा आहे. तानाजीचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. परंतु, हे फोटोशूट करण्यामागचं कारणही तानाजीने स्पष्ट केलं. तानाजीच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, ‘माझे पाय तर योग्य रचनेत नाहीयेत, पण माझं संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!’

आपल्या स्वतःच्या शरीराची सकारात्मकता या विषयावर हे खास फोटोशूट करण्यात आलं आहे. तानाजीच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तानाजीने इतरांच्या शरीराकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या फोटोतून जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी अभिनेत्री वनिता खरातच्या अशाच न्यूड फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. आता तानाजीचा फोटोदेखील नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतोय आणि तुफान व्हायरल होतो आहे.