” मोहरा ” हिंदी चित्रपट आठवला की सर्वांत आधी आठवते ती मोहरा मधील सुंदर अभिनेत्री. जिचं नाव आहे, रविना टंडन. मोहरा सोबत तिला अनेक अश्या चित्रपटात अभिनय करताना आपण पाहिलेलं आहे. एकेकाळची ती आघाडीची अभिनेत्री होती. पण आता ती फार कुठं काम करताना दिसत नाही.
रवीना टंडन ही 90 च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मोहरा, दिलवाले, अंदाज अपना अपना, पत्थर फूल आणि दमण यांच्यासह अनेक चित्रपटांत तिने भूमिका केल्या आहेत. ज्या आजही रसिकांच्या मनावर चित्रपट पाहिला की प्रेमाने राज्य करतात. मोहरा या चित्रपटात रवीनाचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडले होता आणि चाहत्यांनी तिला सुंदर अभिनेत्री म्हणण्यास सुरवात केली होती. त्यावेळी तारुण्यात असलेली रवीना आता 46 वर्षांची आहे.
तिने सलमान खानच्या सोबत ” पत्थर फूल ” या चित्रपटाद्वारे सुरुवात केली होती. हा चित्रपट हिट ठरला; अश्यात पहिल्याच चित्रपटापासून रवीनाला स्टारडम मिळाला. ती सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली.
आता ती दोन मुलांची आई आहे. रवीनाने ” छाया आणि पूजा ” या दोन मुलींना दत्तक घेतलेलं आहे. तिने याच दत्तक मुला मुलींना स्वतःच्या मुलांसारखं सांभाळ करण्याचं ठरवलं आहे.
रवीनाचा नवरा आणि दोन मुलं (रवीना टंडन हाऊस) यांच्यासोबत मुंबईच्या वांद्रे येथे राहतेय. सध्या कुटुंब जीवनात ती आनंद घेत आहे.ती एका सुंदर तीन मजली इमारतीत कुटूंबासोबत राहत आहे.
त्यांनी बराच विचार करून घराचा प्रत्येक कोपरा डिझाइन केलेला आहे. भिंतीवर काळा दगड आणि आसपास असणारी झाडे त्यांच्यामुळे घरास एक आकार आलेला आहे.
स्वप्नातील हे घर सजवण्यासाठी रवीनाने स्वत: बर्याच गोष्टी लक्ष घालून केलेल्या आहेत. घराच्या आत लाकडी मजला आहे. जोशी उत्तम डिझाइन केलेला आहे.
रवीनाने आपल्या घरातले दिवे आणि वॉल डेकोरेशनची खास काळजी घेतली आहे. घरातील बहुतेक सजावट वस्तू स्वत: विकत घेतल्या आहेत. जेव्हा जेव्हा ती परदेशी जाते, तेव्हा ती तिच्या घराची सजावट करण्यासाठी उत्तमोत्तम वस्तू घेऊन येते.
रवीनाने तिच्या घरातील फर्निचर आणि पडदे यांचे रंग सुद्धा खूपच सुंदर निवडले आहे. रवीना आणि अनिल यांनी निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आपल्या घराची रचना आधुनिक सुंदरतेच्या शैलीमध्ये केली आहे.
तिच्या घराविषयी रवीना म्हणते, “मला माझ्या बंगल्यात निसर्ग हवा होता. मला केरळमधील घरे आवडतात आणि त्यापासून प्रेरणा घेऊन मी या घराची रचना केली आहे. जिथं आनंदी वातावरण अनुभवता येईल.
रवीनाने आपला बंगला काळ्या, लाल आणि राखाडी दगडांनी सजविला आहे. बंगल्यात एक मंदिर देखील आहे, ज्यात कुटुंबातील लोक बसून प्रार्थना करतात. भक्तिमय वातावरण निर्माण करतात.
घराची वास्तू बांधताना त्याची खूप काळजी घेण्यात आली आहे. मंदिर अशा प्रकारे तयार केले गेले आहे, की संपूर्ण वेळ तिथे सूर्यप्रकाशाचा प्रकाश येतो.
रवीनाच्या घरात प्रवेशद्वार खूप सुंदर आहे. घराच्या दाराजवळ गणेशाची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते.
करोडो रुपये खर्च केला; पण नादच केला. घराला राजमहाल बनवला. पैसा आणि टेक्निक सोंत असेल तर सगळं शक्य ये.