राणा दा आणि अंजली या जोडीने रसिकांच्या मनात घर केलेलं आहे. तीन वर्षे झालेली असले तरी मालिका अजूनही रंगत आहे. या मालिकेत आधी वाहिणीसाहेब यांची भूमिका धनश्री काडगावकर साकारकरायची. पण तिने मालिका सोडल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला होता की आता ती भूमिका करणार कोण ? पण आता उत्तर मिळणार आहे. झी मराठी वाहिनीवर सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेल्या मालिका पैकी एक म्हणजेच तुझ्यात जीव रंगला.

मालिका कुठपर्यंत आली ? तर तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. सगळ्यांचा हिसाब चुकता करायला नंदिता वहिनी पुन्हा एकदा या मालिकेत एन्ट्री घेत असल्याचे नुकतेच एका प्रोमोत पाहायला मिळाले. प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे. त्यामुळे मालिका ही पुन्हा रंगत आलेली आहे. पण ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नेमकी कोण याची उत्सुकता आता पाहायला मिळत आहे. तुमची ही उत्सुकता अधिक ताणून न धरता या अभिनेत्रीबद्दल आज जाणून घेऊयात…

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून नंदिता वहिनीसाहेबांची भूमिका साकारणाऱ्या या नवख्या अभिनेत्रीचे नाव आहे “माधुरी पवार”. आपल्याला नवं ही वाटलं असेल किंवा कदाचित अनेकांनी हे नाव ओळखलेही असेल, झी युवा वाहिनीवरील अप्सरा आली या शो ची विजेती म्हणून माधुरीने आपले नाव गाजवले आहे. तिने त्यावेळी फार लोकप्रियता मिळवलेली आहे. तिला नृत्य फार आवडतं.

नृत्याची फार आवड असलेल्या माधुरीच्या टिकटॉकवरील नृत्याच्या अदाकारीने अनेक चाहत्यांना घायाळ केले होते. तिचे महाराष्ट्र मध्ये अनेक चाहते आहेत.तिची हीच अदाकारी अनेक लावणी नृत्यामधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

मूळची सातारा जिल्ह्याची असलेली माधुरी आपल्या आई वडिलांच्या प्रेत्साहनाने नृत्यात निपुण झाली. वडील जोतिराम पवार गवंडी काम करत. त्यामुळे ज्या गावी काम त्या गावी त्यांचा मुक्काम असायचा. तिथेच त्यांनी आपल्या मुलीला माधुरीला नृत्याचे धडे दिले पुढे यातूनच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा तीने गाजवल्या. नृत्यासोबतच अभिनयाचे धडेही तिने गिरवले. अजय गोगावले यांनी गायलेल्या “पावसाळी या ढगांनी” म्युजिक व्हिडीओ मध्ये माधुरी झळकली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून माधुरी छोट्या पडद्यावर झळकत आहे. ही भूमिका ती कशी वठवते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरत आहे. नंदिता वहिनीसाहेबांच्या भूमिकेसाठी माधुरी पवार हिला स्टार मराठी कडून अनेक अनेक शुभेच्छा…