Rajeshwari Kharat Interview – Itemgiri Marathi Movie

3790

Rajeshwari Kharat Interview – Itemgiri Marathi Movie

प्रेमाची व्याख्या सांगणारा अॅटमगिरी : राजेश्वरी खरात

Fandry फँड्री सिनेमा तुम्हा सर्वांना माहित असेल हो ना ? मग त्यातली जब्याची प्रेमिका शालू पण तुम्हाला आठवत असेल. आता शालू मोठी झाली आहे, म्हणजेच Rajeshwari Kharat राजेश्वरी खरात. आता सिनेमाची नायिका म्हणून तुमच्या भेटीला येत आहे. Itemgiri अॅटमगिरी हा तिचा नवा मराठी सिनेमा ९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिचा नायक हंसराज जगताप आहे. आपल्या सिनेमाबद्दल ती काय सांगते ते बघुया.कसा मिळाला तुला अॅटमगिरी सिनेमा ?

खंरतर फँड्री सिनेमा रिलीज झाला तशा मला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. पण मला एकही सिनेमाची गोष्ट माझ्यासाठी म्हणून योग्य वाटली नाही. पण जेव्हा अॅटमगिरी सिनेमाची गोष्ट मला ऐकवली गेली तेव्हा ती गोष्ट मला माझ्या वयाची आहे अशी वाटली म्हणून मी तो सिनेमा स्वीकारला.

Itemgiri अॅटमगिरी सिनेमातली तुझी भूमिका काय आहे ?

अॅटमगिरी सिनेमात मी कॉलेजला जाणाऱ्या सृष्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. हा सिनेमा म्हणजे कॉलेज विश्वातील मुलांच्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना आहेत. सृष्टी तशी एक गावातली मुलगी आहे पण गावातून ती शहरात जाते आणि नंतर काही काळाने पुन्हा आपल्या गावी परत येते आणि परत आल्यावर जे काही घडतं ते म्हणजे Itemgiri अॅटमगिरी सिनेमा.

हिरोईन म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता ?अरे बाप रे. लहानपणापासून आपण पहात आलोय. हिरो आणि हिरोईन झाडामागे नाचत गात असतात. ते प्रत्यक्षात मला इतक्या लवकर करायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मला आठवतं माझा शुटींगचा पहिला दिवस होता. मी जेव्हा सेटवर आली तेव्हा सेटवर माणसांची खूप गर्दी झाली होती. मला वाटलं कि, नेहमीप्रमाणे गावात पहिल्यांदा शुटींग होतं तेव्हा अशी गर्दी होतेच. पण जेव्हा सेटवरील लोकांनी मला सांगितले कि जरा वेळ तू बाहेर निघू नको, कारण सर्व तुला बघायला आले आहेत. हे एकूण मी जरा घाबरली पण मला त्याचे खूप कौतुक देखील वाटले कि प्रेक्षक इतके प्रेम करतात. आजही तो क्षण माझ्या लक्षात आहे.

Itemgiri अॅटमगिरी सिनेमाबद्दल काय सांगशील ?

या सिनेमाबद्दल मी इतकेच सांगेल कि, हा सिनेमा जरी तरुण मुलांसाठी असला तरी मोठयांना देखील हा तितकाच आवडणार आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या प्रेमाबाबत नेमक्या काय कल्पना असतात. प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे याबाबत हा सिनेमा भाष्य करतो. माझ्या आणि हंसराज शिवाय सिनेमात मिलिंद शिंदे, छाया कदम यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Rajeshwari Kharat New HD Photos