राजेश्वरी खरातसाठी वीस किलो श्रीखंड
फँड्री सिनेमा तुमच्या लक्षात असलेच होय ना ? जब्या जिच्यावर जीवापाड प्रेम करतो तीच शालू आता मोठी झाली आहे. म्हणजेच राजेश्वरी खरात. ती आता चक्क हिरोईन झाली आहे. अॅटमगिरी हा तिचा नवा मराठी सिनेमा येतो आहे. यात ती राष्ट्रीय पुरस्कार विजेत हंसराज जगतापची नायिका आहे. नुकतीच तिच्या बद्दलची एक भन्नाट गोष्ट कळली आहे. ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ती म्हणजे Rajeshwari Kharat राजेश्वरी खरातसाठी वीस किलो श्रीखंड.. काय आहे हे सर्व प्रकरण बघा तर तुम्ही…
राजेश्वरी खरात मुळची पुण्याची. फँड्री सिनेमा करत असतांना ती आठवी इयत्तेत होती. पुण्याच्या पी.जोग. शाळेत तिचं पहिली ते दहावी शिक्षण झालं आहे. आता राजेश्वरी सिनीअर कॉलेजला आहे. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं कि कधी सिनेमात काम करेल परंतु फँड्री सिनेमाने सर्वच बदलून गेल्याचे तिने सांगितले. ती पुढे सांगते कि, फँड्री नंतर खूप सिनेमांच्या ऑफर्स आल्या पण योग जुळून आला नाही.Itemgiri अॅटमगिरी सिनेमाची ऑफर आली. मला गोष्ट आवडली म्हणून मी लगेचच हा सिनेमा स्वीकारला. यात मी हिरोईन आहे. मज्जा आली राव करतांना.
Itemgiri अॅटमगिरी सिनेमाचे शुटींग सुरु होते. शुटींगचा जवळपास दुसरा दिवस होता. रोजप्रमाणे शुटींगवर जेवण यायचे. पण त्यात राजेश्वरीचं आवडतं श्रीखंड नव्हतं. दोन दिवस सलग तिने श्रीखंड खाण्याची इच्छा बोलून दाखवली…आणि तो एक दिवस उगवला ज्या दिवशी सगळ्यांनीच तिला सरप्राईज म्हणून श्रीखंड आणले. दिग्दर्शक, सहकलाकार, निर्माते इ. सर्वांनी एवढे श्रीखंड आणले की सेटवर चक्क वीस किलो श्रीखंड आले. पूर्ण दिवस श्रीखंडमय झाल्याचे राजेश्वरी सांगते.
अॅटमगिरी सिनेमा म्हणजे तारुण्यातली धमाल लव्ह स्टोरी आहे. पण वास्तवात जे जे घडते तसेच या सिनेमात घडते आहे. राजेश्वरी पुढे सांगते कि, मला अजूनही आठवतो आहे या सिनेमाच्या शुटींगचा पहिला दिवस. कॉलेजचा सीन होता. मी कॉलेजला येते आणि सर्व मुलं माझ्याकडे बघतात असा सीन होता. पण सर्व मुलं माझ्याकडे अशी पाहत होती ना की मला आकवर्ड झालं. पण दिग्दर्शन प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी माझी हिम्मत वाढवली आणि समजावून सांगितले तेव्हा मी हा सीन करू शकले. जेव्हा तुम्ही बघाल हा सीन तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल. राजेश्वरी पुढे सांगते की, सिनेमात मी सृष्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे जी छोट्या गावातून मोठ्या शहरात जाते आणि पुन्हा आपल्या गावाकडे परतते.
अक्षय कुमार, दीपिका पादुकोन, प्रियांका चोप्रा, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव हे तिचे रोल मॉडेल आहेत. श्रीखंड तिचा आवडता पदार्थ आहे. पण घरचं जेवण तिला खूप आवडतं. तुम्हाला ती सोशल मिडीयावर दिसत असेल पण तिने आज सांगितले आहे की तिचे फेसबुकवर एकही अकाऊंट नाही. जे आहेत ते सर्व फेक आहेत. परंतु मला माझ्या चाहत्यांच्या संपर्कात राहता यावं म्हणून मी फक्त एक Page केले आहे तेवढेच. आता अॅटमगिरी मधून मला तुम्ही एका वेगळ्याच रुपात बघाल..आणि तुम्हाला खूप आवडेल हे माझे नवे रूप.