२३ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होतोय ‘राक्षस’ !
 ‘फॅन्ड्री’ आणि ‘हाफ तिकीट‘ या यशस्वी आणि अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या टीमचा नवा आगामी सिनेमा –‘राक्षस’ .
 दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग यांची कलाकृती “राक्षस ‘
नावात काय आहे? ‘ असं सर्रास म्हटले जाते. पण नावात बरंच काही असतं, विशेषतः आशयघन चित्रपटांच्या नावात!. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा बरोबर दिग्दर्शक समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन जोडी प्रेक्षकांना ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राक्षस नाव ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात भीती दाटून येते. राक्षसाच एकच भयावय रूप आजपर्यंय आपण गोष्टींमध्ये ऐकलं आहे. नुकतंच ह्या चित्रपटाचं पहिल पोस्टर प्रदर्शित झाल आहे व प्रेक्षकांनी त्याला खूप चांगली पसंती दिली आहे.
           ह्या सिनेमाची कथा कौटुंबिक पार्श्वभूमीवर बेतली असून थ्रिलर सस्पेन्स देखील पाहायला मिळेल. आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं ‘राक्षस’ च लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत. समित कक्कड यांनी आतापर्यंत एकाहून एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून समित कक्कड यांचा ‘आयना का बायना’ हा पहिला चित्रपट असून तो सोनी मॅक्ससाठी हिंदीत डब होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. शिवाय ‘हाफ तिकीट’ हा समित कक्कड यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट असून १५ निरनिराळ्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स’ मध्ये या चित्रपटाची निवड झाली होती आणि आता ‘राक्षस’ चे ते प्रस्तुतकर्ते आहेत.
 
            राक्षस चित्रपटात ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयानं वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे.
        दरम्यान या चित्रपटाच्या पोस्टर मुळे चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली असून, २३ फेब्रुवारीला ‘राक्षस’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.