फोटोकॉपी १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या हातात 

PHOTOCOPY 16 Septembar

आपल्या सुरेल आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहा राजपाल आपल्याला आता नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘फोटोकॉपी’ या सिनेमाच्या निमित्ताने निर्मात्याच्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस  या नवोदित कलाकाराची यात प्रमुख भूमिका आहे, तर या दोघांसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Photocopy  (2016) –  Marathi Movie Songs Free Dounload 

व्हायकॉम इंटरनॅशनल आणि नेहा राजपाल यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. नुकतंच या सिनेमाचं नवंकोरं पोस्टर सोशल मीडियावर टाकण्यात आलं आहे.

या सिनेमातील पर्णच्या दोन्ही व्यक्तिरेखांसाठी असलेला लुक आपल्याला या पोस्टरवरून दिसून येतो आहे. या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

 सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत.  मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here