आश्‍वी खुर्द,ता.संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त, दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत होता, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

आश्‍वी खुर्द येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (ता. १८) पासून शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसात वाजता भजनाच्या आयोजन केले होते. रात्री ठीक बारा वाजता शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा साजरा करण्यात करण्यात आला.

सोमवारी (ता. १९) सकाळी नऊ वाजता भव्य पारंपरिक शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम मिरवणुक व १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त‎ रक्तदान शिबिर या उपक्रमाचे आयोजन केले‎ होते. अर्पण ब्लड बँक व शिवजयंती उत्सव समिती, आश्‍वी खुर्द यांच्या संयुक्त विदयमाने सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद‎ लाभला.‎

सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती व रात्री ७.३० ते १० वाजेपर्यंत लायटिंग शो व भव्य आतिषबाजी करण्यात आली.

शिवजयंती उत्सव समिती, आश्‍वी खुर्द यांच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमासाठी ग्राम पंचायत आश्‍वी खुर्द, भजनी मंडळ आश्‍वी खुर्द, पोलीस प्रशासन तसेच गावातील सर्वच शिवप्रेमींनी सहकार्य केले.