आज-काल ऐतिहासिक विषयांवरती काढलेले चित्रपट प्रचंड गाजत आहेत. बाजीराव मस्तानी, जोधा-अकबर असे असे अनेक उदाहरण आपल्याला यासाठी देता येतील. अनेक दिग्दर्शक सध्या ऐतिहासिक चित्रपटांवर काम करत असल्याचं देखील कळत आहे. मराठीमध्ये तर तर फर्जंद या चित्रपटापासून ऐतिहासिक चित्रपटांचं पीकच आलं आहे. “ऐतिहासिक सिनेमे तयार करताना आपल्याकडे सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते.

परंतु, सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे काहीतरी खोटे-नाटे दाखवने असं हल्ली झालं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.” असं मत आहे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच. ओम राऊत यांनी नुकताच तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

चित्रपटात अनेक ऐतिहासिक तथ्य दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. एका मुलाखतीदरम्यान ओम राऊत यांनी या संपूर्ण चित्रपटाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. कसा होता या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊया ओम राऊत यांच्या नजरेतून.

ओम राऊत यांच्या मते सर्वात महत्त्वाची बाब होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कोण करणार? खरंच प्रत्येकासाठीच ही निवड नक्कीच अवघड ठरेल. ओम राऊत या निवडीबद्दल खूपच साशंक होते.

परंतु जेव्हा त्यांना शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी योग्य वाटला तेव्हाच त्यांनी हे कास्टिंग केल्याचं या मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. या भूमिकेसाठी शरद केळकर याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यासोबतच मेकअप डिझायनर आणि त्याच्या टीमनेही खूप मेहनत घेतल्याचे ओम राऊत यांनी सांगितले.

या चित्रपटामध्ये अनेक वर्षांपूर्वीचा काळ उभा करणे हे एक मोठं आव्हान होतं. परंतु ओम राऊत यांनी खूप चांगल्या प्रतीचे व्हिएफएक्स वापरल्यामुळे तो काळ उभे करण्यात त्यांना यश आले आहे. याबद्दल बोलताना ओम राऊत म्हनाले की,” ज्या गोष्टी तुम्हाला करायचा आहेत आणि विशिष्ट प्रमाणात करायच्या आहेत. त्यासाठी VFX वापरले जातात. मला माझ्या सिनेमात हे जग उभं करायचं होतं त्यासाठी VFX एक आदर्श माध्यम होतं.”

सुरुवातीला सांगण्यात आलं सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक ऐतिहासिक चित्रपटामध्ये घेतली जाते. जसे की या चित्रपटामध्ये तानाजी मालुसरे यांना नृत्य करताना दाखविण्यात आलेले आहे. ही एक प्रकारची सिनेमॅटिक लिबर्टीच म्हणायला हवी. परंतु अजून एक गोष्ट इतिहासप्रेमींना खटकली आहे, ती म्हणजे या कथेमध्ये तानाजी मालुसरे यांच्याकडे असलेल्या घोरपडीचा साधा उल्लेख देखील नाही.

चित्रपटामध्ये आपल्याला घोरपडे बंधू दिसतात. ही सिनेमॅटिक लिबर्टी आहे का असे विचारल्यावर ओम राऊत म्हणाले,” कोंढाण्याची लढाई 1670 साली झाली आहे त्यानंतर 1830 च्या सुमारास एक पोवाडा लिहिला गेला, ज्यात घोरपडीचा उल्लेख आहे. त्यामुळेच तो पोवाडा देखील आपल्यासाठी अर्वाचीन आहे.

लहानपणी आपल्या कानावर पडलेल्या कथेत त्या घोरपडीचा उल्लेख आहे परंतु ऐतिहासिक बखरीत घोरपडीचा उल्लेख सापडत नाही. शालेय पाठ्यपुस्तकात देखील घोरपडीचा उल्लेख नाही. शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर घोरपडीच्या सहाय्याने कडा सर करणे अशक्य आहे. त्यामुळे सिनेमात घोरपड दाखवण्यात आलेली नाही.

पण मराठ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्य विषयी, किल्लासर करण्याविषयी अनेक संदर्भ इतिहासात आहेत. म्हणूनच, मी सिनेमातही घोरपडे बंधू दाखवले आहेत. पण हे करत असताना आपण सिनेमॅटिक लिबर्टीचा दुरुपयोग करू नये. कथानकाला अधिक प्रभावशाली करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी चा वापर करायला जावा. सिनेमॅटिक लिबर्टी या शब्दाचा हल्ली गैरवापर होताना दिसतो आहे. पण हे चुकीचं आहे.”

या चित्रपटाच्या निर्मिती आधी ओम राऊत यांनी इतिहासाचे अवलोकन केले आहे कथानकाच्या विविध संदर्भात पासून तेव्हाचे पोशाख शस्त्रसामग्री गड-किल्ल्यांच्या परिसर आधी सगळ्यांचा अभ्यास ओम राऊत यांनी केलेला आहे सिनेमाची भाषा हिंदी मराठी फ्रेंड्स हा नियम असतो मला तानाजींची वीर गाथा जगासमोर ठेवायची होती त्यामुळेच मी हिंदी या भाषेचा निवड केली असेही राऊत यांनी सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.