इतिहास आणि वर्तमान यांना जोडणारी एक कडी म्हणजे राम सेतू. आज हा राम सेतू भरपूर पुरातत्व वैज्ञानिक व भूगर्भ तज्ञ् ह्याचा आवडीचा विषय आहे. कारण खरच भारत व श्रीलंका यांच्या मध्ये राम सेतू आहे का? उत्तर आहे होय ! तर मग हा निसर्गाचा चमत्कार आहे

कि मनुष्याची किमया ? जागतिक पातळीवर राम सेतूला & अॅडम्स ब्रिज & म्हणून ओळखतात. भूगर्भ तज्ञ् व पुरातत्व वैज्ञानिक यांनी उपग्रहावरून मिळालेल्या चित्राचा अभ्यास करून व या सेतूतील पाण्यावर तरंगणारे दगड व त्यातील वाळू यांचे अध्ययन करून अंदाज लावलाय कि भारताच्या दक्षिणेतील धनुष्यकोटि आणि श्रीलंकेच्या वायव्य दिशेला असलेल्या मंनार बेट ह्यांना मध्यभागी ४८ कि.मी समुद्रावर आलेला पृष्ठभाग म्हणजेच हा राम सेतू होय.

तेथील वाळू व दगड यांचा अभ्यास केल्यास हि वाळू कमीत कमी ७ हजार वर्षंजुनी असून दगड हे ४ हजार वर्ष जुने आहेत. ह्यावरून असे लक्षात येते कि हे दगड कुठल्यातरी दुसऱ्या ठिकाणहून आणले गेलेत.

म्हणूनच काही वैज्ञानिक याला महामानवी कृत्य मानतात. भूगर्भ शात्राचे अभ्यासक डॉ.अलान ल्यानस्टर ह्यांच्यामते हा पूल प्रभू श्रीरामाच्या वानरसेनेनेच बनवला आहे. रामायणा नुसार हा सेतू ३५०० वर्ष जुना आहे. कवी कालीदासांच्या रघुवंश या संग्रालयात देखील या सेतूचा संदर्भ आला आहे. याशिवाय स्कंदपुराण, विष्णुपुराण, ब्रम्हपुराण, ह्यामध्ये ह्या राम सेतूचा संदर्भ आला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.