नीता अंबानी हे नाव आज कुणा एखाद्या व्यक्तीच्या परिचयाचं नसेलं, असं होणं क्वचितच. रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड चे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांच्या त्या पत्नी आहेत. त्या दोघांच्या लग्नाला आता तब्बल 36 वर्ष पूर्ण होत आहेत. 8 मार्च 1985 रोजी दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता.
अंबानी कुटुंबातल्या छोट्या सुनेने अर्थात टीना अंबानी यांनी मुकेश व नीता अंबानी यांना लग्नाच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “मुकेश व नीता ही एक अशी जोडी आहे जी एकमेकांसाठी पुरक स्वरूपाची आहे. जिथे आता तुम्ही दोघे आजी-आजोबा या नात्याचा आनंद घेत आहात तिथे तुम्हा दोघांना स्वास्थ्य, आनंद लाभो, तुमचं एकत्र आयुष्या असचं बहरत राहो.”
अशा स्वरूपाचे शब्द लिहित त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. तुम्हाला कदाचित हि थोडीशी आश्चर्याची बाब वाटेल पण अंबानी कुटुंबाची सुन होण्यापुर्वी नीता अंबानी या शाळेत केवळ 800 रूपयांच्या पगाराच्या नोकरीवर काम करत असायच्या.
या काळात त्यांना लहान मुलांना शिकवण्याची आवड तर होतीच याशिवाय त्यांना क्लासिकल डान्सदेखील आवडत असायचा. त्यांची ईच्छा पुढे चालून त्यात करियर करायचीदेखील होती. नीता अंबानी यांनी मागे एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, कोणत्या घटनेने त्यांच आयुष्य अगदीच बदलून टाकलं. त्यांनी आपल्या आयुष्यातील सारं जग बदलून टाकणाऱ्या घटनेबद्दल त्यावेळी स्वत:हून खुलासा केला होता.
नीता अंबानी एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दरम्यान आपलं नृत्यकौशल्य सादर करत होत्या. त्यावेळी धीरूभाई अंबानी व त्यांच्या पत्नी कोकीला बेन हे दोघेही या कार्यक्रमात हजर होते. यावेळी नीता अंबानी यांनी सादर केलेली नृत्यकला ही धीरूभाई व कोकीला बेन या दोघांच्याही मनात घर करून गेली.
यानंतर ओळख झाली, भेटीगाठी वाढू लागल्या. कोकीला बेन यांच्या मतानुसार नीताने नोकरी करायची गरज नाही, असं मत पुढे आलं होतं. नीता अंबानी यांच्या मनात आपल्या नोकरीबद्दल फार प्रेम होतं. त्यांनी सर्वप्रथम मुकेश यांना नकार दिला होता. परंतु पुढे एकमेकांना जाणून घेतल्यानंतर बात हळूहळू पुढे वाढू लागली.
परंतु तरीही कुठेतरी नीता अंबानींच्या मनात भविष्यात नोकरीचं काय? हा प्रश्न मनात उद्भवत होता. नीता अंबानी या सर्वप्रथम ज्याक्षणी मुकेश यांच्या घरी गेल्या होत्या त्यावेळी खुद्द मुकेश यांनी दरवाजा उघडत त्यांच स्वागत केलं होतं. त्यावेळी मिडल क्लास कुटुंबात वावरणाऱ्या नीता अंबानीसाठी मुकेशचं एवढ्या श्रीमंत घरात राहूणदेखील साध, सरळ राहणं मनोमन भावून गेलं होतं.
अगदी पांढरा शर्ट आणि एक काळी साधी पॅन्ट, अशा पेहरावात मुकेश अंबानी त्याकाळी त्यांच्यासमोर उभे होते. मुकेश अंबानी आजही फार स्टायलिश राहत नाहीत हे सर्वांनी पाहिलं आहे. खरतरं पुढे दोघांच लग्न जरी अरेंज मॅरेज झालं असलं तरी आधी प्रेम होऊनचं मग हा विवाह पार पडला होता. त्यामुळे या लग्नाला लव्ह-अरेंज असं नाव देता येऊ शकतं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!