जगाच्या नकाशावर श्रीमंताची यादी तपासली की समोर येत आपल्या देशातील एका श्रीमंत व्यक्तीचं नाव. मुकेश धीरूभाई अंबानी.

मुकेश अंबानी केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण आशियातील श्रीमंत व्यक्ती आहेत. अब्जावधी किंमतीची मालमत्ता असलेले मुकेश अंबानी फक्त आपल्या उत्कृष्ट व्यवसायिक दृष्टीनेच नव्हे तर आपल्या जीवनशैलीसाठी देखील खूप प्रसिद्ध आहेत.

मुकेश अंबानी जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक अँटिलीयामध्ये राहतात. या 27 मजल्यावरील लक्झरी घरात सुमारे 600 नोकरदार काम करतात.

आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, मुकेश अंबानी नोकरदारांना किती पगार देतात ?..चला तर मग जाणून घेऊयात.

लाईव्ह मिरर च्या २०११ च्या रिपोर्ट्सनुसार घरकाम करणाऱ्या नोकरदारांना प्रत्येकी महिना ५० हजार ते २ लाख मिळतो. ज्यामध्ये मग सर्व कर्मचारी वर्ग येतो.

बरं एवढंच नाहीतर सरकार एवढ्या सुविधा देत नसेल, एवढ्या अंबानी कुटुंब देतं. मुकेश आणि नीता अंबानी आपल्या कर्मचार्‍यांना पगारासह विमा व शिक्षण भत्ता देतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे नोकर असणाऱ्यांची मुलं मुली परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. अंबानी कुटुंब त्यांच्या चालकाला तब्बल २ लाख रुपये पगार देतात.

आज प्रत्येक ड्रायव्हर ला वाटलं असेल की चला आपण पण तिथं नोकरी करू. पण इथं ड्रायव्हर म्हणून जॉब मिळवणं खूप अवघड आहे. अनेक गोष्टी येत असणे गरजेचे आहे.

त्यांचा स्वयंपाक बनवनारा ही लाखो पगार घेतो. मुकेश अंबानी यांना मात्र साध्या पध्दतीने बनवलेलं जेवण आवडतं.

अश्या प्रकारे अंबानी कुटुंबात काम करण्यासाठी पैसे लाखों मिळतात; पण त्यासाठी उत्तीर्ण होणं सुद्धा काही मोठी परीक्षा देण्याइतकं अवघड आहे. दिसतं तेवढं सोपं नसतं.