Prashansha Sharma

लॉक डाऊन काळात प्रेक्षकांना सगळ्यांना एकच उत्सुकता लागलेली होती, की मिरझापुर वेबसिरीजचा दुसरा भाग नेमका कधी येतोय ? तर आता दुसरा भाग आलेला आहे. आणि त्यातली बरीच पात्र खूप लोकप्रिय होत आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर ‘मिर्झापूर २’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहे. ‘मिर्झापूर’मुळे कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना या भूमिका प्रसिद्ध झाल्या. भूमिका एवढ्या मजबूत पडद्यावर साकारल्या आहेत, की प्रेक्षकांना खूपचं आवडत आहेत.

या भूमिकांच्या तोंडी असणारे संवाद, तिथली बोलीभाषा आणि एकंदरीतच या सीरिजबद्दलच्या सर्वच गोष्टी सध्या चर्चेत आहेत.फक्त प्रमुख भूमिकाचं साकारणारे हिट ठरले नाहीतर छोट्यातली छोटी भूमिका ही खूप लोकप्रियता मिळवत आहे.

त्यातील कलाकारांची सोशल नेटवर्किंगवर व्हायरल चर्चा आहे. आज आपण अश्याच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ? जिने छोट्याश्या भूमिकेतून सिरीज मध्ये अस्तित्व उभं केलं.

मिर्झापूर वेबसिरीजच्या दुसऱ्या पर्वातील शेवटच्या भागामधील एक दृष्य सध्या सोशल नेटवर्किंगवर मिम्सच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. कारण यामध्ये बाबुजींची हत्या करण्याच्या तयारी असलेल्या सुनेला घरातील मोलकरणी असणारी राधा थांबवते आणि बंदुकीऐवजी चा’कू’ने जीव घेण्याचा सल्ला देते. म्हणजे हे खूप अनपेक्षित आहे.

बाबूजीला मा’रा’य’ला मकबूल आलेला असतो; पण सून आणि मोलकरीण यांनी पाहिल्यावर वि’रो’धात जाण्याऐवजी आम्ही मा’र’णार असं बोलून मकबूल सोबत प्रेक्षकांना ही हैराण करून टाकतात. याच दृष्यातील अनेक स्क्रीनशॉर्ट मिम्स म्हणून व्हायरल झालेत. पण मग त्यात मोलकरीण म्हणून छोटीशी व्हायरल होणारी भूमिका कोण करत आहे ?

दोन्ही भागांमध्ये मोलकरीण राधाची लक्षात राहणारी लक्षवेधी भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे, प्रशंसा शर्मा. ती मूळची झारखंड मधील झुमरी तल्लाया येथील आहे. जन्म ही तिथलाच आहे. वेबसिरीज मध्ये ती सर्वसाधारण मोलकरीण आहे; पण खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि हॉट आहे.

ते कशावरुन तर तिच्या सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटो वरून. शिवाय ती मॉडेल्स म्हणून कार्यरत आहे. तिने शालेय शिक्षण डेहराडून मधून पूर्ण केलं तर ग्रॅज्युएशन दिल्ली च्या हिंदू कॉलेज मधून तेही फिलॉसॉफी मध्ये. तिला लहानपणीपासूनच डान्स, आणि अभिनयाची आवड होती. जी आता करियर बनलेलं आहे.

मुंबईत येऊन तिने पराग्वे फिल्म स्कूल अ‍ॅण्ड ड्रामामध्ये अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली. आणि आज ती वेगवेगळ्या सिरीज, चित्रपट आणि मालिका यांमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा !…