मित्रांनो!, नुकताच मराठीतील आघाडीचे कॉमेडी किंग श्री. अरुण कदम यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळयाला मराठी सिनेनाट्य सृष्टीतील अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती होती. परंतु सर्वात जास्त चर्चा होती ती सौ. वैशाली अरुण कदम अर्थात त्यांच्या धर्मपत्नीची.

अरुण कदम यांच्या पत्नीचे नाव वैशाली कदम असे आहे. त्यादेखील सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अरुण कदम आणि वैशाली कदम हे सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो अपलोड करत असतात. त्यांच्या फोटोला खूप मोठ्या प्रमाणात लाईक देखील मिळत असतात. वैशाली कदम या दिसायला अतिशय सुंदर अशा आहेत.

एखाद्या चित्रपट अभिनेत्रीला लाजवेल असे त्यांचे सौंदर्य आहे. अरुण कदम यांच्या मुलीचे नाव सुकन्या कदम असे आहे. काही दिवसापूर्वी सुकन्या हिचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याला मराठीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अरुण कदम यांचे जावई एका बिअर कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत असल्याचे समजतेय.

अरुण कदम यांच्याबद्दल सविस्तर सांगायचे झाल्यास, आपल्या अफलातून टायमिंग मुळे प्रेक्षकांच्या चांगलेच मनोरंजन करतात. अरुण कदम यांची आगरी भाषेवर प्रचंड पकड आहे. आगरी भाषेवर पकड असल्यामुळे ते आगरी भाषेतच विनोद करताना देखील दिसतात. अरुण कदम हे मराठीतील दिग्गज असे कलाकार आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटक या मध्ये काम केलेले आहे.

त्यांनी अनेक मराठीतील दिग्गज कलाकारांसोबत देखील काम केलेले आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यासारख्या कलाकारांसोबत त्यांनी विनोदी भूमिका साकारलेल्या आहेत. अरुण कदम यांनी आजवर ओवाळते भाऊ राया, घंटा जलसा, शिन्मा, जस्ट गंमत, सासुबाई गेल्या चोरीला, टाटा बिर्ला आणि लैला या आणि इतर चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

विशेष म्हणजे अनेकांना माहीत नाही की, अरुण कदम यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. होय, 2009 मध्ये आलेल्या “बायपास” या हिंदी चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती. त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्याचबरोबर 2011 मध्ये “दिल तो बच्चा है जी” या चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. सनी देओल याच्या “काफिला” या चित्रपटातही ते दिसले होते.