कोव्हिड रूग्णांसाठी मराठी कलाकार मैदानात, आले मदतीसाठी धावून!

सध्याच्या घडीला देशात आणि महाराष्ट्रात कोरोना या आ’जा’रा’चा वि’ळ’खा प्रचंड प्रमाणात पसरला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पहायला मिळतं आहे. हे संकट इतकं गंभीर स्वरूपाच निर्माण झालं आणि आपल्याला सर्व पुरक गोष्टींचा तुटवडा निर्माण होऊ लागला.

यात मग बेड्स असतील, ऑक्सिजन बेड्स असतील, प्ला’झ्मा’चा तुटवडा असेल, रे’म’डे’सी’वी’र असेल तर अशा गोष्टी ज्या एखाद्या व्यक्तीला कोरोनावर मात करण्यात मदत करू शकतात, त्याच गोष्टी आपल्याकडे नेमक्या कमी पडू लागल्या आणि सगळीकडेच बराच गोंधळ उडाला. सध्या रू’ग्णा’ल’ये, सामाजिक संस्था ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करतच आहेत. आणि आता मराठी कलाकारांनीदेखील कोरोनाच्या लढ्यात मदत करायला वाटचाल केल्याची पहायला मिळते आहे.

मराठी कलाकारांनी कोरोनात लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पुरक माहिती, त्यांची उपलब्धता यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक मोहीम चालू केल्याची पहायला मिळते आहे. अनेकदा असं होत आहे की, आपण ज्या दवाखान्यात पे’शं’ट’ला नेतो तिथे बेड उपलब्ध नसल्याने आपल्यासमोर आता काय करावं हे प्रश्नचिन्ह उभं राहतं? तर अशावेळी काही इतर दुसऱ्या छोट्या द’वा’खा’न्या’त बेड उपलब्ध असू शकतो, पण त्याची माहिती आपल्याला मिळत नाही.

मोठ्या शहरात भरपूर प्रमाणात अशा घ’ट’ना सध्यातरी घडत असल्याच्या पहायला मिळतं आहेत. तर मग अशी माहिती आवर्जून मिळणं गरजेची आहे, हे लक्षात घेऊन मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर ही नवी युक्ती साकारली आहे. या नव्या मोहीमेच नाव आहे, महाको’व्हि’ड. तर एक नजर टाकूयात यावर काय आहे नेमकं हे महाको’व्हि’ड?

महाको’व्हि’ड अर्थात महा म्हणजे महाराष्ट्र या अर्थाने आणि साहजिकचं को’व्हि’ड अर्थात कोरोना. सध्या सर्वत्र हॅशटॅग जोडून “महाको’व्हि’ड” हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवण्यात येतो आहे. याला प्रतिसाद मिळतो आहे, आणि यामुळे अनेकांना आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ लागल्याने थोडाफार दिलासा अनेकांना मिळाला आहे.

कोरोनाच्या संदर्भात बेड, ऑक्सिजन बेड्स, प्ला’झ्मा, रे’म’डे’सी’वी’र वा इतर कोणतीही अडचण जर तुम्हाला येत असेल तर सोशल मीडियावर जाऊन “महाको’व्हि’ड” हा हॅशटॅग लावत तुम्ही तुमची अडचण पोस्ट केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर त्यासंदर्भात इतरांकडून आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिल्या जात आहे. याबाबत नुकताच अभिनेता स्वप्नील जोशी याने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्याने हेदेखील म्हटलं आहे की, सध्याच्या गं’भी’र परिस्थितीत शक्य तितक्या सकारात्मक गोष्टींचा प्रसार लोकांपर्यंत होऊ द्या, जेणेकरून हा अडचणीचा काळ किमान काहीसा तरी दिलासादायक ठरेल.

तो सध्या त्याच्या सोशल मीडियावर सर्व को’व्हि’डबाबत गरजेच्या पोस्ट आणि बातम्यांचाच प्रसार करणार असल्याचंही त्याने म्हटलं आहे. मराठी सिनेसृष्टीतल्या इतर कलाकारांनीदेखील या कामात आता पुढाकार घेतला आहे. हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी, समीर वि’ध्वं’स यांनी या मोहिमेत भाग घेत एकमेकांना मदतीच आवाहनदेखील केलं आहे.

स्वप्नील जोशीने सध्या चालवलेल्या या ट्रेंडला गरज आहे तिथे चांगला प्रतिसाद मिळतो आहे, अनेकांना हवी ती गोष्ट, माहिती वेळेत उपलब्ध व्हायला मदत होते आहे. दिग्दर्शक समीर वि’ध्वं’स हादेखील को’व्हि’ड संदर्भातल्या हव्या त्या गरजेच्या माहितीला वारंवार पोस्ट करताना पहायला मिळतो आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!