मराठी सिनेसृष्टीत या वर्षात अनेक घडामोडी घडत आहेत. यात प्रामुख्याने लग्नसोहळे, कुणाच्या कुटुंबात नवजात शिशुचे जन्म घेणे, कुणी नव्याने लग्नबंधनात अडकण्याकडे पाऊल टाकणे थोडक्यात यांसारख्या बऱ्याच घटना घडत असताना पहायला मिळत आहेत.
मराठी सिनेसृष्टीत नुकतचं अगदी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं क्युट कपल म्हणजे, सखी गोखले आणि सुव्रत जोशी. दोघांच लॉ’क’डा’उ’न’च्या दरम्यानच लग्न झाल्याच आपल्या कानापर आलं. एकप्रकारे रसिकप्रेक्षकांच्या मनाला ते अचानक भेटलेलं थोडसं सरप्राईज गिफ्ट होतं असंच म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या अकाउंटवरून नुकतच या कपलच्या बाबतीतली एक आनंदाची बातमी समोर आल्याचं पहायला मिळत आहे. ही बातमी आहे दोघांच्या मधे येणाऱ्या कोण्यातरी नव्या तिसऱ्याबाबतची.
अर्थात विवाहबंधनात अडकलेल्या “सुव्रत आणि सखी या दोघांच्या मधे तिसरा आलायं” अशी खबर एका पोस्टच्या माध्यमातून स्वत: सुव्रतनेच दिली आहे. सध्यातरी सोशल मीडियात या तिसऱ्या गोष्टीबाबतची चर्चा फारच रंगली आहे. मुळात दोघांनीही एक कार खरेदी केल्याचं माहित पडलं आहे.
सुव्रत आणि सखी यांनी एक नवी कार खरेदी करत त्यासोबत त्यांचा आनंद शेअर करताना पोस्टवर कॅप्शन देत स्पष्ट लिहले आहे की, १९९६ सालापासून माझी आई एखादी कार घेण्याचं स्वप्न पाहत आली आहे. आज तब्बल २५ वर्षांनंतर तिची ईच्छा पुर्ण होत आहे. मी एकूणच मध्यमवर्गीय होतो आणि माझ्यासाठी ही गाडी खरेदी करणं खरच खुप महत्वाची गोष्ट आहे. काही काळापुरत मी सेकंड हँड कार निश्चितच वापरली आहे. परंतु शेवटी हक्काच्या स्वत:च्या नव्या गाडीचा आनंद वेगळाच असतो. सुव्रत पुढे हेदेखील म्हणाला आहे की, अनेक वर्षे गाडी न घेण्याचा निर्धारही त्याने केला होता.
सुव्रतच्या म्हणण्यानुसार त्याला गाडी खरेदी करायची गरज वाटत नव्हती. परंतु अनेकदा पब्लीक ट्रॉन्सपोर्ट अवलंबून राहणं शक्य होतं नव्हतं. आणि जर समजा इलेक्ट्रिक गाडी खरेदी केली असती तर भारतात अजून तेवढ्या मुबलक सुविधा त्यांकरता उपलब्ध नाहीत, म्हणून मग शेवटी एकदाचा निर्णय घेत स्वत:च्या समाधानासाठी गाडीचे थेट ए’न’र्जी ऑडिट करून, ती गाडी खरेदी केली.
तो म्हणाला की, मी कदाचित फार विचार करून गाडी घेतली असेल कारण मी तज्ञांकडून गाडीचा वापर, त्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा जो फटका बसेल त्यासाठी पुढच्या पाच – सहा वर्षात तेवढ्या प्रमाणात झाडे लावण्याचा मानसदेखील सुव्रतने बांधला आहे.
आणि त्याने त्याकरता सुरवातदेखील केली आहे. त्याने नव्या गाडीच्या निमित्ताने पेढे वाटताना एकेकाला वृक्ष लागवडीसाठी इतरांनाही प्रोत्साहित केले आहे. सुव्रत म्हणतो की नव्या पिढीची एक नवी पद्धत, परंपरा म्हणून आपण असे काही प्रयोग वापरात चालू करू शकतो. नवी गाडी खरेदी केल्यानंतर पुढील काही वर्षे आपण झाडांची लागवड करायची.
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून सर्वांच मन जिंकणाऱ्या सुव्रतने पुढे चालून मन फकिरा, पार्टी, गोष्ट एका पैठणीची, फकीरा अशा काही सिनेमांमधून त्याने आपल्या भुमिका उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर वठवल्या आहेत. सखी गोखलेदेखील उत्तम अभिनेत्री आहे. तिलाही दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून चांगली प्रसिद्धी मिळाली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!