माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सध्यातरी शेवटच्या टप्प्यावर चालू आहे. पुढील आठवड्याभरात ही मालिका सर्वांचा निरोप घेताना दिसेल. परंतु या मालिकेने अनेक चांगल्या कलाकारांना लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली हे निश्चित. त्यापैकीच एक उत्कृष्ठ कलाकार म्हणजे सचीन देशपांडे. अर्थात त्याने माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेतून श्रेयस नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

या व्यक्तिरेखेला रसिकप्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद निश्चितच मिळाला. तर याच लाडक्या व्यक्तिरेखेची भुमिका पार पाडलेला अभिनेता म्हणजे सचीन देशपांडे आणि याला नुकतीच एक मुलगी झाली आहे. कन्यारत्न प्राप्त झाल्याने सचिन फारच आनंदी आहे. शिवाय त्याचं कुटुंबदेखील अगदी उत्साहाने आता मुलीच्या नामकरणाचा सोहळा अर्थात बारशाचा कार्यक्रम पार पाडणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा रंगण्याच मुळात कारण म्हणजे, सोशल मीडियावर सचिनने शेअर केलेला एक व्हिडिओ.

या व्हिडिओच्या माध्यामातून सचिनने सांगितले की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलीच्या नामकरणाला प्रत्येकाला बोलावू शकत नाही परंतु तिच्या नामकरणाचा सोहळा हा ऑनलाईन पार पाडू शकतो. आणि त्याकरता त्याने निमंत्रणपत्रिकादेखील बनवली आहे.

या निमंत्रणपत्रिकेला शेअर करताना सचिन म्हणाला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज अनेक सोहळे र’द्द करावे लागते आहेत, प्रत्येकाने काळजी बाळगणं गरजेचं आहे. शिवाय तुम्ही जरी माझ्या मुलीच्या बारशाला उपस्थित राहू शकत नसला तरी ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यामातून आम्ही प्रयत्न करून बनवलेला हा व्हिडीओ पाहून, माझ्या मुलीकरता सर्वांनी आशिर्वाद नक्की द्या. त्याने हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची विनंतीही सर्वांना केली आहे.

सचिन देशपांडे एक सदाबहार कलाकार आहे. तो सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याच्या आजवरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर फॅमिली कट्टा, कॅरी ऑन मराठा, अजिंक्य या सिनेमातून तो मोठ्या पडद्यावर झळकला आहे. याशिवाय झी मराठीची याआधी चांगली गाजलेली मालिका म्हणजे, “काहे दिया परदेस” या मालिकेचाही तो भाग राहिला आहे.

सचिनने हिंदी सिनेसृष्टीतही काही प्रमाणात आपल्या कामाची छाप पाडली आहे. सोनी लिव्ह या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या हम बने तुम बने या हिंदी मालिकेमधून त्याने काम केलं आहे. सध्या सचिनच्या अनोख्या मुलीच्या नामकरणाच्या कार्यक्रमाची जी चर्चा रंगली आहे. त्याबाबत बोलताना सचिन म्हणाला की, त्याच्या आयुष्यात गुरूवार हा दिवस नेहमीच एक आनंदी आणि लकी ठरला आहे.

सचिनचा बायको पियुशा सोबत साखरपुडा, तिच्यासोबत लग्न दोन्ही गोष्टी गुरूवारीच घडून आल्या. आणि आणखी खास घटना घडली ती 24 डिसेंबर रोजी, याही दिवशी योगाने गुरूवार आला आणि पियुशाला आॅपरेशन थिएटरमधे घेऊन जाण्यात आलं. अर्धा तास उलटून गेल्यावर सचिन जास्तच चिंतीत झाला असताना अचानक डॉक्टरांकडून एक न्यूज समजली की, सचिनला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

सचिनसाठी गुरूवार योगायोगाने चांगलाच पथ्यावर पडणारा आणि लकी ठरू लागल्याने त्याने आपल्या मुलीचा नामकरण सोहळादेखील गुरूवारीच करायचं नियोजन केलं. आणि आता सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमधून समजून येत आहे की त्याने मुलीचं नाव मीरा असं ठेवलं आहे. सचिन त्याची पत्नी पियुशा हिच्यावर खुप जास्त प्रेम करतो. नेहमी तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोघांचे फोटो शेअर करत असतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!