अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अर्थात महाराष्ट्रात केवळ महाराष्ट्राची वहिणी म्हणून प्रसिद्ध असलेली जेनेलिया, दोघेही भन्नाट आणि अवलिया प्रकारच्या नेहमी काही ना काही व्हिडिओ क्लिप्स बनवून रसिकप्रेक्षकांच मनोरंजन करत असतात. दोघांचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असल्याचं आपण सोशल मीडियावर पाहत असतो.

जेनेलिया अगदी तिच्या कलेच्या खुप साऱ्या अदा या ना त्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आजवर मांडत आली आहे. आणि अभिनेता रितेश देशमुखदेखील आपल्या कलाकृतीची दखल प्रेक्षकांना घेण्यास सर्वच क्षेत्रातून भाग पाडतो हे निश्चित आपण पाहिलं असेल. मागे एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तिने, यहांपर हमारी “पावरी हो रही है” असा शब्दांचा अपभ्रंश करून वाक्याचा वापर केला होता.

त्या स्त्रीकडून आलेल्या “पावरी हो रही है” या शब्दांना घेत तमाम सिनेसृष्टीने अनेक विनोदी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वच ठिकाणी सध्या रितेश आणि जेनेलिया वहिणी या दोघांनी केलेला व्हिडिओ फारच गाजताना पहायला मिळत आहे.

तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल परंतु जेनेलिया डीसुजा आणि रितेश देशमुख यांनी चक्क त्यांच्या कुत्र्याचा वाढदिवस हा “पावरी हो रही है” म्हणतं सेलीब्रेट केला आहे. अर्थातच एखाद्या प्राण्याचा असा काही व्हिडिओ बननं फारच वेगळी बाब आहे. पावरी हो रही है या स्टाईलमधे जेव्हा रितेशने आपल्या कुत्राच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ शेकर केला तेव्हा अनेकांनी त्याला लाईक्स आणि भन्नाट विनोद कमेंट्सही केल्याच पहायला मिळालं आहे.

मुळात अभिनेता रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या वहिणी जेनेलिया यांनी मिळून बनवलेल्या व्हिडिओमधे रितेश व जेनेलिया यांची मुलं आणि आणखी ठराविक काही लोक दिसत आहेत. या व्हिडिओमधे फ्लॅशला अर्थात कुत्र्याला स्क्रीनवर दाखवतो नंतर तो स्वत: स्क्रीनवर दिसतो व त्यानंतर इतरही लोक त्यामधे पहायला मिळतात.

“हा फ्लॅश आहे, हा मी आहे आणि ही आमची पार्टी होत आहे.” अशा स्वरूपाचे शब्द रितेशच्या तोंडून या व्हिडिओमधे ऐकायला मिळतात. यात फ्लॅश हे मुख्यत्वाने रितेशच्या कुत्र्याच नाव आहे. या व्हिडिओला शेअर करताना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फ्लॅश असा कॅप्शन हा रितेश देशमुख याने दिला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडिओला क्षणार्धातच दोन लाखांपेक्षा अधिक लाईक्स गेले असून खुप साऱ्या कमेंट्सचा वर्षावही यावर झालेला पहायला मिळतो आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा या दोघांनाही तमाम सिनेसृष्टीत अथवा इतर बाबतीत एक उत्कृष्ठ कपल म्हणून ओळखलं जात.

याशिवाय दोघांबाबत खास बात जर सांगायची झालीच तर ती ही की, “तुझे मेरी कसम” या सिनेमात ही जोडी सर्वप्रथम एकत्र दिसली आणि त्यानंतर ती जोडी ऑफस्क्रीनवरदेखील एकमेकांसोबच आयुष्यभरासाठी जोडल्या गेली. साधारण २०१२ साली जेनेलिया आणि रितेश विवाहबंधनात अडकले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!