मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृ’द्धा’प’का’ळाने नि’ध’न झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. रवी पटवर्धन यांनी अनेक लहानमोठी नाटके, चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या “झी मराठी” वाहिनीवरील “अग्ग बाई सासूबाई” ही मालिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरली.
1944 मध्ये वयाच्या अगदी सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाट्य महोत्सवातील एका बालनाट्यात काम केले होते. तेव्हा या नाट्य महोत्सवाचे अध्यक्ष हे बालगंधर्व होते. तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये “आरण्यक” हे नाटक रत्नाकर मतकरीं सोबत केले. तेव्हा यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती.
झी मराठी वाहिनीवरील “अग्ग बाई सासूबाई” या मालिकेतील सोहमच्या आजोबांची म्हणजेच आशुतोष पत्की ही भूमिका रवी पटवर्धन हे साकारत होते. या मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने तसेच लाडका नातू सोहमचे लाङ करण्यापासून ते त्याची का’न’पि’ळी करणारे हे आजोबा महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले होते. त्यांची शिस्तबद्ध पद्धत तसेच मायेचा ओलावा हा तर रवी पटवर्धन यांचा स्वभाव होता.
को’रो’ना लॉ’क’ङा’ऊ’न काळात मालिकांचे शूटिंग बं’द होते. परंतु त्यानंतर अ’न’लॉ’क काळात पुन्हा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असता, रवी पटवर्धन हे व्हिडिओ कॉलिंग मार्फत मालिकेमध्ये प्रेक्षकांना एक- दोन वेळा दिसले होते. आपल्या वयोमानामुळे ते मालिकेच्या शूटिंगसाठी प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकत नव्हते.
रवी पटवर्धन हे मुंबई मध्ये ठाणे शहरात राहतात. ते मुंबईच्या रिझर्व बँकेत काम करत होते. आपली नोकरी सांभाळून आणि सहकारी व अधिकारी यांच्या मदतीमुळे त्यांना आपली अभिनयाची हौस भागवता आली. ठाण्यातील राहत्या घरात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.
काल रात्री ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना श्वा’स घेण्यास त्रा’स होत होता. म्हणून त्यांना तातडीने खा’ज’गी रु’ग्णा’ल’या’त दाखल करण्यात आले. मार्चमध्येही त्यांना हृ’द’य’वि’का’रा’चा झ’ट’का आला होता. तेव्हापासून पटवर्धन यांची त’ब्ये’त नाजूक होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, जावई, मुलगी व चार नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
रवी पटवर्धन यांच्या अ’क’स्मा’त नि’ध’नाने अखंड मराठी सिनेसृष्टीला खूप मोठा ध’क्का बसला आहे. “अग्ग बाई सासूबाई” या मालिकेतून सर्व तरुणाईचे लाडके आजोबा हे आपल्याला सोङून गेले, हे पचवणे खरं तर अत्यंत क’ठी’ण आहे. रवी पटवर्धन यांसारख्या मेहनती, निष्ठावंत अभिनेत्यांना स्टार मराठीतर्फे भा’व’पू’र्ण आ’द’रां’ज’ली.