सोशल मीडिया एकप्रकारे सर्वच गोष्टींच साधन आजच्या आधुनिक जगात झाल्याच पहायला मिळतं आहे. आणि या सोशल मीडियावर कधी, काय, कोणती गोष्ट कशाप्रकारे किंवा कोणत्या माध्यमातून कधी पुढे येईल याचीही शाश्वती देता येत नाही. आता तुम्हीच विचार करू शकता का की, एक मंगळसुत्र चर्चेचा विषय होऊ शकेल.

खरतरं यात मिताली मयेकर या अभिनेत्रीच्या प्रकाशझोतात आलेल्या फोटोंमधे पाहून अनेक महिला, स्त्रिया, मुलींनी तिच्या पेहरावाची चर्चा करत असताना थेत खुप सारी चर्चा ही मंगळसुत्रावरदेखील केली आहे. आणि याच फॅशनची चर्चा चांगलीच रंगली होती ती अभिज्ञा भावे या अभिनेत्रीच्या लग्नावेळेस. खरतरं याची सुरुवात झाली ती म्हणजे, टॉलीवुड अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या गळ्यातील मंगळसूत्रापासून. या मंगळसुत्राची खासीयत काळे मणी आणि डायमंडचा पेंडंट यांची सांगड घालून बनवलेलं डिझाईन आहे.

सिद्धार्थ आणि मिताली मयेकर या दोघांचा लग्नसोहळा पार पडला आणि सर्व ठिकाणी या दोघांच्याच लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक रसिकप्रेक्षकांनी या दोघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकदा तुम्ही ज्या काही सेलिब्रिटींना फॉलो करता त्यांच्याकडे ब्रॅण्डिगसाठी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतो आणि मग त्यांच्या माध्यमातून थेट प्रोडक्ट्सचीच जाहिरातबाजी सुरू होते.

जसं की, सेलीब्रेटी हातात घड्याळ घालून फोटो शेअर करतात किंवा ठरविक कपड्यांचा लोगो असलेला फोटो शेअर केला जातो, थोडक्यात कळत नकळत ते त्या प्रोजक्टकडून निश्चितच पैसे घेतात. आणि आता तर थेट मंगळसुत्रदेखील ब्रॅण्ड होऊन ज्या चांगल्या सेलीब्रेटीच्या गळ्यातून झळकणार म्हटलं की नक्कीच चर्चा रंगणार आणि जाहिरातीसाठी स्पर्धा तयार होणार.

लग्न झाल्यानंतर सर्वच कलाकार एकप्रकारे आपलं रॉयल आयुष्य जगण्यात पुन्हा गुंतले असताना रसिकप्रेक्षकांमधे एखाद्या मंगळसुत्राच्या डिझाईनवरून चर्चा रंगण आणि ते डिझाईन स्पेशली मिळवण्यासाठी धडपडणं खरोखरच गमतीशीर विषय आहे.

सध्याच्या घडीला मिताली मयेकर आणि तिचा नवरा अर्थात सिद्धार्थ चांदेकर हे दोघेही आपला लग्नानंतरचा काय सुखात व्यथित करत असताना पहायला मिळत आहेत. दुसरीकडे लवकरच अभिनेत्री मिताली हिचा एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीसाठी मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. आणि त्या सिनेमाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

या सिनेमात अभिनेता सुयश टिळक हा असणार असल्याने प्रेक्षकांमधून या नव्या सिनेमाकरता फारच जास्त उत्सुकता निर्माण होत असल्याची पहायला मिळते आहे. “हॅशटॅग प्रेम” असं या सिनेमाचं नाव असणार आहे आणि हा सिनेमा याच वर्षभरात आपल्या भेटीस येणार आहे. दुसरीकडे काही क्षणांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर आला आहे.

आणि या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसादही मिळत असल्याचं पहायला भेटत आहे. “हॅशटॅग प्रेम” या सिनेमाचं टायटल साँग हे गेल्या आठवड्यात प्रसिद्ध होऊन तरूणाई वर्गाचा विशेषत: त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

काही प्रमाणात हा व्हिडीओ अकारण ट्रोल झाल्याचेही समजले आहे. दुसरीकडे सध्या मंगळसुत्राची जी कहानी रंगली आहे तिच्याबाबत म्हणालं तर मितालीच्या खास लग्नामधील फोटोवरून ती फॅशन प्रकाशझोतात आली आहे. आता ही फॅशन किती लग्नांमधे पहायला मिळणार ही बात अगदीच मजेशीर असेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!