सध्या मराठी सिनेसृष्टीत काही दिवसांपूर्वी जी लग्नाची गजबज झाली ते पाहून सध्या जर कोणीही एखाद्या जोडीदाराला सोबत घेऊन फोटोशुट अथवा प्रेमाचे व्हिडिओज वगैरे अशा काही गोष्टी जर सोशल मीडियावर शेअर केल्या तर साहजिकच पुढील काही कालावधीत यांचाही विवाहसोहळा उरकणारं हे रसिकप्रेक्षकांकडून ग्राह्य धरल्या जात आहे.

संस्कृती बालगुडे या अभिनेत्रीने लग्नाचं थेट फोटोशूट करत त्यावर कॅप्शन लिहताना ती म्हटली आहे की, 2021 मधलं हे सर्वाधिक रॉयल फोटोशुट आहे. आणि हे केवळ तेवढचं असणार आहे लग्नाचा काही विचार नाही. मात्र तरीदेखील तिच्या चाहत्यावर्गाला तिची आणि तिने शुट केलेल्या सोबतच्या पार्टनरची जोडी फारच भावली आहे.

विशेष बाब म्हणजे संस्कृतीने ज्या व्यक्तीसोबत हे फोटोशुट केलं आहे तो व्यक्ती सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीचा भाऊ आहे, त्याच नाव अतुल आहे. खरतरं एका फॅशन ब्रॅण्डकरता या दोघांनीही हे फोटोशुट केलं असल्याची माहिती मिळाली आहे. रॉयल घराण्याप्रमाणे एका महालात हे फोटोशुट पार पडलं. खरतरं उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या संस्कृतीने आपल्या नृत्यकौशल्यानेदेखील रसिकप्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

सध्यातरी संस्कृती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फारच ॲक्टीव्ह असल्याची आपण नेहमीच पाहतो. मुळात सध्या व्हायरलं होत असलेल्या या फोटोशुटची चर्चा याकरता अधिक होत आहे कारण, अतुल हा सोनाली कुलकर्णी हिचा भाऊ आहे. खरतरं हे फोटोशुट अगदी सुरूवातीला पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सना आश्चर्याचा धक्का बसल्याच पहायला मिळालं होतं.

संस्कृती बालगुडे हिने टिव्ही मालिकांमधे काम करत आजवर रसिकप्रेक्षकांची मने जिंकली. आणि तिचं करियर एका चांगल्या दिशेत तिने आज आणून ठेवलं आहे. अगदी निरागसतेचा साज ठेवत सहजरित्या तिने ज्याही भुमिका साकारल्या त्या रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. खरतरं तसं पाहता अतुल आणि संस्कृती बालगुडे ही जोडी याआधीही प्रेक्षकांच्या भेटीस फोटोशुट नाही तर एका खास गाण्याच्या माध्यमातून आली होती.

हे गाणं अर्थातच होतं, “धरला माझा हात”. त्यावेळीही दोघे जितके चर्चेत आले होते तितकेच आजही पुन्हा या फोटोशुट मुळे चर्चेत आले आहे. सध्याच्या फोटोशुटवर अतुलची बहिण अर्थात महाराष्ट्रातली लाडकी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली हिने दोघांच्या फोटोवर कमेंटदेखील केली आहे. सोनाली म्हणाली की, “दोघेही एकत्र खुप छान दिसत आहात.”

तिच्या अशा कमेंटनेही अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. दुसरीकडे हे केवळ फोटोशुट असल्याच थेट संस्कृतीने म्हटलं आहे. शिवाय आम्ही रिलेशनशीपमधे नाही आहोत असंही संस्कृतीने मेन्शन केलं आहे. संस्कृतीने कपड्यांच्या ब्रॅण्डसाठी हे शुट केलं आहे.

शिवाय तिने शेअर केलेल्या फोटोंमधे तीच सौंदर्य अधिकच खुलून दिसतं असल्याचं पहायला मिळतं आहे. पेस्टल थिम असलेला नवविवाहित नवरीचा तिने लेहंगा अंगावर परिधान केलेला पहायला मिळतो आहे. त्यावर साज चढवत तिने हिरे आणि मोत्यांपासून तयार केलेले दागिने घातले आहेत.

चाहत्यांमधून तिच्या या लुक्सवर लाईक्स आणि कमेंट्सचा जबरदस्त वर्षाव होत आहे. कदाचित या जोडीला जर सर्वत्र चांगली पसंती अधिक प्रमाणात मिळू लागली तर एखाद्या प्रोजेक्टवर दोघेही एकत्र काम करताना पहायला मिळू शकतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!