शिवराज्यभिषेक दिनानिमित्त देवदत्ता नागेचा ‘म मराठी’

M Marathi Devdutt Nage

“सह्याद्रीचा आवाज आमच्या कानात वाजतोय, तयारीला लागा माझा राजा सिंहासनावर बसतोय! उत्सव मराठेशाहीचा, अखंड स्वाभीमानाचा! शिवराज्याभिषेक दिनाच्या संपूर्ण महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा!”

 

आज तारीख ६ जून, ‘शिवराज्याभिषेक दिना’चे औचित्य साधून देवदत्त नागे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘म मराठी’ या लघुपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

 

श्रीराम समर्थ प्रॉडक्शन आणि अर्जुनराजे एंटरटेनमेंट निर्मित ‘म मराठी’ लघुपटाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सहदेव मा. घोलप यांनी पेलली आहे. जय मल्हार मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे या लघुपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

आता मराठीत व्यक्त व्हा कारण ‘म मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिमान बाळगा ‘म मराठी’चा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here