Lalbaugchi Rani

आपल्याच विश्वात रमणारी ‘लालबागची राणी
हा सिनेमा कोणत्याही मसालेदार सिनेमासारखा नाहीये पण या सिनेमातील निरागसता अनुभवण्यासारखी आहे.

Lalbaugchi Rani (2016) Marathi Movie Songs Free Download

‘स्पेशल चाईल्ड्सचं अनोखं विश्व दाखवणारे अनेक सिनेमे मराठीत आले आहेत. जवळपास ते सर्वच सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. या सिनेमांच्या यादीत आणखी एका अशाच सिनेमाची भर पडली आहे तो म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘लालबागची राणी’ या सिनेमाची. हा सिनेमा या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलीचं विश्वतर उलगडतोच सोबतच मायानगरी असलेल्या मुंबईतील काही वेगवेगळ्या लोकांचंही वेगळं विश्व समोर आणतो. एक चांगली कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा कोणत्याही मसालेदार सिनेमासारखा नाहीये पण या सिनेमातील निरागसता अनुभवण्यासारखी आहे.

(हे पण वाचा: शाहरुखचा सिनेमा शूट करताना दिग्दर्शकाला सापडली ‘लालबागची राणी’)

ही कथा आहे स्पेशल चाईल्ड असलेल्या संध्या नितीन परूळेकरची. संध्याला सर्वजण लाडाने लालबागची राणी म्हणतात. तिचं स्पेशल असणं इतरांना पचणारं नसल्याने लहानपणापासून कित्येक वर्ष तिला घराबाहेरच काढण्यात आलं नाहीये. ती २४ वर्षांची असली तरी तिचं मन, तिचं वागणं हे सहा वर्षांच्या मुलीसारखं आहे. तिच्या २४व्या वाढदिवशी तिचे आई-वडील तिला बाहेर फिरायला घेऊन जातात आणि ती अचानक हरवते. सगळीकडे तिचा शोध घेतला जातो पण ती सापडत नाही. ती हरवते आणि तिला वेगवेगळी लोकं भेटतात. त्यांची आणि लालबागच्या राणीची ही मस्त कथा आहे. संध्या ही स्पेशल चाईल्ड असली तरी खूप समंजस आणि हुशार आहे. ती घरी जाते की नाही? कशी जाते? तिला कोण कोण भेटतं? तिच्यासोबत काय घडतं ? हे जाणून घेण्यासाठी सिनेमा बघितलेला बरा.

Lalbaugchi Rani (2016) Marathi Movie Video HD Free Download

अनेक वर्ष हिंदी सिने इंडस्ट्रीत एक नावाजलेले सिनेमटोग्राफर म्हणून काम करत असलेले सिनेमटोग्राफर लक्ष्मण उतेकर यांचा हा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा आहे. याआधी ‘टपाल’ या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. या सिनेमातही वीणा जामकरने काम केलं होतं. आता पुन्हा त्यांनी एकत्र काम केलंय. लक्ष्मण उतेकर यांचा सिनेमटोग्राफीचा मोठा अनुभव त्यांच्या दिग्दर्शनात बघायला मिळतो. ‘लालबागची राणी’ची मांडणी खूप चांगली केली आहे. एका मुलीच्या कथेसोबत आजूबाजूच्याही काही महत्वाच्या कथा यात दिग्दर्शकाने खूप चांगल्या पद्धतीने पेरल्या आहेत. इतकंच काय तर स्वत: सिनेमटोग्राफर दिग्दर्शक असल्याने सिनेमाची सिनेमटोग्राफी फारच सॉलीड झालीये.

Lalbaugchi Rani Marathi Movie Poster

या सिनेमाची कथा रोहन घुगे यांनी लिहिली आहे. कथा चांगली आहे पण पटकथा जरा लांबवल्यासारखी वाटते. या सिनेमाची कथा तर उत्तम आहेच सोबतच पटकथाही खूप डिटेल्ड लिहिली गेली आहे. संवाद मजेदार आणि सतत काहीतरी सांगणारे आहेत. त्यामुळे संवाद अधिक मनाला भिडतात. संवाद छान आणि अर्थपूर्ण झाले आहेत. आपण सिनेमातून नेहमी बघतो त्यापेक्षा वेगळी मुंबई या सिनेमात बघायला मिळते.

वीणा जामकरने पुन्हा एकदा तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. याआधीही तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून सर्वांना चकीत केलंय. या सिनेमात तर तिने खूपच चांगलं काम केलंय. संध्या शरिराने मोठी आहे पण मनाने लहान आहे हे तिने तिच्या बहारदार अभिनयातून उत्तमपणे निभावलं आहे. सोबतच अशोक शिंदे यांनी संध्याच्या वडीलांच्या, प्रतिमा जोशीने संध्याच्या आईच्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय. सोबतच प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदीता धुरी यांनीही त्यांच्या भूमिका छान साकारल्या आहेत.
सिनेमातील गाणीही चांगली जमून आली आहेत. त्यातील मुंबईची ओळख सांगणारं ‘लाडाची मुंबई’ गाणं लक्षात राहतं. संगीतकार रोहित नागभिडे यांनी दिलेलं संगीत आणि पार्श्वसंगीतही मस्त जमलंय. तर लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनात लॉरेन्स यांनी केलेली सिनेमटोग्राफी बहारदार झालीये.

एकंदर काय तर हा सिनेमा नेहमीच्या मसालेदार सिनेमांसारखा नाहीये. ही कथा एका स्पेशल चाईल्डची असून तिचं तिचं वेगळं विश्व या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. एक वेगळा अनुभव म्हणून हा सिनेमा तुम्ही बघू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here