Kareena Kapoor facing problems in pregnancy

अलीकडच्या काळात करीना आपली आई बबिताला भेटायला गेली होती आणि यादरम्यान, तिच्या बेबी बंपची फोटो खूप व्हायरल होत आहेत.

मात्र, यावेळी करीनाच्या चेहऱ्यावर चित्र थकलेले दिसत होतं. पायात सूज आली होती. ज्यामुळे थकवा करीनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा गर्भवती आहे. लवकरच ती एका बाळाची आई होणार आहे. अश्यात इतर गरोदर महिलेंसारखी तिचा चेहरा उतरलेला होता. साडेपाच महिन्यांची गर्भवती करीना देखील गरोदरपणाच्या समस्यांना सामोरे जात आहे.

करीना तिची आई बबिता कपूर यांच्या घरी भेटायला गेली होती, तेव्हा मुंबईत घरी तिला स्पॉट करण्यात आलं. तिचा बेबी बंप एका बाजूला स्पष्ट दिसत होता. ती लचकत चालत होती; कारण तिच्या पायात थोडी थोडी सूज येऊ लागली आहे.

व्हायरल झालेल्या फोटोतून समोर आलेल्या फोटोमध्ये करीना मास्क लावून काळजी घेताना दिसली होती. करिनाने यावेळी सैल, मोकळा ड्रेस परिधान केला होता, तर सनग्लासेस तिच्या केसांमध्ये अडकवलेला होता.

करीना कपूर खान आणि सैफ अली खान लवकरच त्यांच्या दुसर्‍या मुलाचे स्वागत करणार आहेत. दोघेही तैमुर नंतर पुन्हा आईबाप होणार आहेत.

असं म्हणतायत की नुकतीच करीना दिल्लीहून मुंबईला परतली आहे. करीनाने ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलेलं आहे.

करीना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बाळाला जन्म देईल. एका मीडिया वृत्ताच्या बातमीनुसार दोघेही नवीन घरात या नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत.

या काळात कोरोनापासून बाळाला आणि आईला वाचवण्यासाठी साठी सैफ अली खान सुद्धा खूप काळजी घेतोय. पायाला आलेल्या सुजामुळे चालण्यास होणारा त्रास पुढं जाऊन भयंकर समस्येकडे न घेऊन जाण्यासाठी ही खास काळजी घेतली जात आहे.

खान आणि कपूर यांना त्यांच्या नव्या बाळाच्या आगमनासाठी खूप खूप शुभेच्छा..