Isha Talwar from Mirzapur 2

सध्या कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहे सात ते आठ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे वेबसिरीज, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वर सध्या येत आहेत. त्यामुळे आपण घर बसल्या मोबाइल वर पाहू शकत आहोत. अश्यात ज्या वेबसरीजच्या दुसऱ्या सिझन ची प्रेक्षक वाट बघत होते, ती मिरझापुर २ अमेझॉन प्राईम वर रिलीज झालेली आहे.

दुसरा सिझन पहिल्या सारखा एवढा काही खास नसला तरी त्या सिरीज मध्ये माधुरी यादव ची भूमिका करणारी अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आहे. रातोरात ती नॅशनल क्रश बनलेली आहे. कारण तिचं पात्र सिरीज मध्ये खूप उत्तम पूर्ण डिझाइन केलेलं आहे.

पात्राची सौंदर्य रचना खूप सुंदर झालेली आहे. त्या अभिनेत्रीचं खरं नाव जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता लागलेली असेल. तर चला मग जाणून घेऊयात.

माधुरी यादवच्या भूमिका करून प्रेक्षकांना मनमोहित करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे, इशा तलवार. तिने फक्त हिंदीतच नव्हे तर मल्याळम मध्ये सुद्धा काम केलेलं आहे.

मिर्झापूर २ या वेब सिरीज मध्ये मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री इशा तलवारीने मुन्ना भय्या च्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये ईशाच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरीही या वेब सिरीज चे कौतुक फारसं होत नाहीये. इशाला आपण याआधी सलमान खान सोबत ही पाहिलं असेल. त्या चित्रपटात ही तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.

ईशाने या आधी सलमान खान सोबत ट्यूबलाइट या चित्रपटामध्ये तर अभिनेता सैफ अली खान सोबत या चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र तिचे हे दोन्ही हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. या चित्रपटाला म्हणावं असं यश मिळालं नसलं तरी तिला प्रसिद्धी मात्र चांगली मिळाली.

तिने या क्षेत्रात पदार्पण बालपणीचं एका प्रसिध्द चित्रपटाने केलं होतं. ज्याला आता बरीच वर्षं झालेली आहेत. इशा तलवार आता ३२ वर्षांची असून २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर यांचा चित्रपट “हमारा दिल आपके पास है ” या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होतं.

त्यानंतर तिने तिचा मोर्चा दक्षिणे कडे वळवला. तिथं तिने तिच्या मादक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. जशी मिरझापुर २ मध्ये घेतली आहे.

इशाने खूप संघर्ष केलेला आहे. तिने तेलगू मध्येही काम केलेलं आहे. भाषा अवगत करण्यासाठी ही तिने खूप मेहनत घेतली होती. अनेक जाहिराती आणि काही म्युझिक अलबम मध्येही इशा ने काम केलं आहे.

ईशाने मल्याळम चित्रपट ‘थट्टाथिन मरायथु’ मधून तारूण्यातलं पदार्पण केलेलं आहे. या चित्रपटात तिने एका मुस्लिम मुलीची भूमिका साकारली होती जी एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. या चित्रपटाचा इशाला देखील भरपूर फायदा झाला. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

आज इशा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा..