Sushant Singh Rajput Case Sara Ali Khan

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये आहे, ज्यांनी अल्पावधीतचं स्वतःची अभिनेत्री म्हणून जागा बनवलेली आहे.

सारा अली खानने सुशांत सिंग राजपूतसोबत केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर, सारा रणवीर सिंगच्या सोबत सिंबा या चित्रपटात दिसली होती.

आणि त्यानंतर कार्तिक आर्यन सोबत लव्ह आज तक हाही चित्रपट तिने केला. खूप अल्पवधीतचं तिने अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे.

काही दिवसांपूर्वी तिला सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन मध्ये एनसीबी ने चौकशी साठी बोलवलं होतं. त्यामुळे सारा खूप चर्चेत आली होती. पण अश्यात तिने काहीच टिपण्णी केलेली नाही.

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक अभिनेत्री अडकलेल्या होत्या. त्यात रिया आणि सारा आघाडीवर होत्या.

सारा ने नुकताच या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलेलं आहे. ती म्हणाली, मी ज्या प्रकारची मुलगी आहे, त्याप्रमाणे जर मी बोलण्यास सुरूवात केली तर दररोज मोठा खुलासा होऊ शकतो, म्हणून मी गप्प बसलेले आहे.

इथे आपण काय करतो ? कुठं जातो ? काय बोलतो अश्या प्रत्येक गोष्टी खूप बारकाईने पाहिलं जातं. त्यामुळे बोलताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

मी सध्या काहीच बोलत नाही. कारण मला त्यावर बोलायची सध्या गरज वाटत नाही.

सारा अली खान सध्या लॉक डाऊन काळात जगण्याचा आनंद घेत ती सोशल मीडियावर फार कार्यरत असते. वेगवेगळ्या लुक मधील फोटो ती सतत टाकत असते. सारा स्वाभाविक बिनधास्त अशी मुलगी आहे.