आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अशा अनेक गोष्टी वापरतो, ज्यांच्याविषयी आपल्याला जास्त माहिती नसते. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या मनात या गोष्टी मागील कारण जाणून घेण्याची इच्छा कधीच नसते. परंतु, जर असा प्रश्न आपल्या मनात आला तर आपल्याला नक्की याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास गोष्टीबद्दल सांगणार आहोत.

ज्या आपण वापरतो पण त्यामागील तार्किक गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसते. आम्ही ब्लेडबद्दल बोलत आहोत, आपण कधी विचार केला आहे का की ब्लेडच्या मध्यभागी एक विशिष्ट प्रकारचे डिझाइन का बनविले गेले आहे? कोणत्याही कंपनीच्या ब्लेडवर ते सारखे का आहे?

‘किंग कॅम्प जिलेट’ ने सुरुवात केली

जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांनी 1901 मध्ये आपल्या सहकारी विलियम निकर्सन यांच्या बरोबर ब्लेडची डिझाईन तयार केली. त्या वेळी, ब्लेडची जी डिझाईन बनवली गेली ती आज देखील तशीच आहे. किंग कॅम्प जिलेटने डिझाइन तयार केल्यानंतर त्याचे पेटंट केले आणि सन 1904 मध्ये उत्पादन सुरू केले.

ब्लेडची विशेष अशी डिजाइन का आहे?

1901 मध्ये जिलेट ही एकमेव कंपनी होती जिने रेजर आणि ब्लेड बनवण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ब्लेड बोल्टद्वारे रेझर मध्ये बसवावा लागत असे. म्हणून ब्लेडच्या मध्यभागी एक खास डिझाईन बनविली गेली. जिलेटने प्रथम ब्लू जिलेट नावाने ब्लेड तयार केले. 1904 मध्ये प्रथमच 165 ब्लेड बनविल्या गेल्या.

नंतर ब्लेड बनवण्याच्या इतर कंपन्यादेखील आल्या परंतु त्यांनी ब्लेडची जुनी रचना कॉपी केली कारण समस्या अशी होती की त्या वेळी रेजर हे फक्त जिलेट कंपनीचेच उपलब्ध होते, म्हणून रेजरमध्ये ब्लेड बसविण्यासाठी त्याच डिझाइनमध्ये शेव ठेवणे गरजेचे होते.

ब्लेड बनवण्याची कल्पना कशी आली

1890 मध्ये, जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट हे बाटली झाकण बनवणाऱ्या कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असत. नोकरीला जात असताना, त्याच्या लक्षात आलं की लोक बाटल्या वापरल्यानंतर त्यांची झाकणे फेकून देतात. तरीही अशा लहान वस्तू पासून अशी एक मोठी कंपनी चालू आहे.

अशा परिस्थितीत, त्यांनी देखील असे काहीतरी बनविण्याचा विचार केला, जे लोकांसाठी स्वस्त आहे आणि लोक ते वापरानंतर फेकून देतात. त्या काळी लोक रेझरने दाढी करायचे. परंतु वस्तराशिवाय दाढी करणे खूपच धोकादायक होते, तसेच यास बराच वेळ लागत असे. किंग कॅम्पने रेझरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि दोन-धार असलेली सुरक्षित रेजर तयार केला. डिसेंबर 1901 मध्ये त्यांनी डिझाईनचे पेटंट केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.