महिलांसाठीचा भारतातील सर्वात मोठ्या कंटेन्ट मंच मॉम्सप्रेस्सोने मातांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘मायमनी‘ची सुरुवात केली आहे. मायमनी मंच ३ सोप्या टप्प्यांमध्ये कार्य करतो. सर्व मातांना फक्त एवढेच करायचे आहे की त्यांनी ब्रँडद्वारे जाहीर केलेले कॅम्पेन बघितले पाहिजेत, त्या पात्र असलेल्या कॅम्पेनमध्ये भाग घेतला पाहिजे आणि प्रत्येक कॅम्पेनशी संबंधित पूर्वनिर्धारित रक्कम कमवली पाहिजे. त्यांची एंट्री पात्र ठरल्यावर कॅम्पेनमधील कमाई थेट त्यांच्या पसंतीच्या पेमेंट माध्यमाद्वारे (बँक ट्रान्सफर, पेटीएम किंवा यूपीआय) हस्तांतरित केली जाईल.

मॉम्सप्रेस्सोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की भारतीय मातांच्या अंतःकरणाच्या अगदी जवळील विषय म्हणजे“ आर्थिक स्वातंत्र्य” मिळविण्याची इच्छा – त्या स्वतःचा म्हणू शकतील अशा उत्पन्नाचा एक स्त्रोत. या प्रयत्नात मातांना मदत करण्यासाठी आम्ही मॉम्प्रेस्सो मायमनीच्या लॉन्चची घोषणा करण्यास उत्सुक आहोत – सर्व मातांकरिता त्या वापरत असलेल्या आणि त्यांच्या आवडत्या ब्रँडच्या कॅम्पेनमध्ये भाग घेऊन पैसे कमावण्याचा हा सोपा मार्ग आहे.”

मायमनीमध्ये विविध प्रकारचे कॅम्पेन समाविष्ट आहेत ज्यात मातांसाठी भाग घेणे खूप सोपे असेल. हे सर्वेक्षण भरणे, उत्पादनाचे पुनरावलोकन करणे, कंटेंट बनवणे, बैठकीस उपस्थित राहणे किंवा सोशल मीडिया मंचावर पोस्ट सामायिक करणे या सर्वांइतके सोपे असू शकते. अशा कॅम्पेनच्या माध्यमातून, मॉम्स त्यांच्या घरांमधूनच सहजतेने त्रास-मुक्त पद्धतीने पैसे कमवू शकतील.